पंजाब हरियाणा मधून आणलेल्या गाईचा उन्हाळ्यामुळे होतोय मृत्यू

A cow brought from Punjab Haryana is dying due to heat

भारतात अनेक शेतकरी (Farmer) शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय करतात. सध्या बरेच शेतकरी दुधाचा व्यवसाय करताना दिसून येत आहे. त्यामुळे भारतात दुधाच्या उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. दूध उत्पादनातून शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे. त्यामुळे शेतकऱ्याचा कल हा पशुपालन व्यसायाकडे वाढला आहे.

 मोठी बातमी! शरद पवारांबाबत काँग्रेस नेत्याने केला मोठा गौप्यस्फोट

यामध्ये पंजाब, हरियाणा, बेंगलोरच्या गाई महाराष्ट्रीयन गायीपेक्षा १५ ते २० लिटर दूध जास्त देतात. त्यामुळे दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांनी महाराष्ट्रीयन गाईकडे पाठ फिरवली असून पंजाब हरियाणा बेंगलोरच्या गाई खरेदी करत आहेत.

‘ही’ आहे रोहित पवार यांची आवडती अभिनेत्री; रोहित पवारांच्या ‘त्या’ उत्तराची सर्वत्र चर्चा!

एक गाई खरेदी करायची म्हटलं की दीड ते दोन लाख रुपयांची तयारी ठेवावी लागते. त्यानंतर वाहतुकीसाठी दहा ते पंधरा हजार रुपये खर्च होतो. त्यानंतर ती गायी गोठ्यामध्ये आणली जाते. मात्र गेल्या पंधरा दिवसांमध्ये पंजाब, हरियाणा आणि बेंगलोर या राज्यांमधून आणलेल्या गाई मृत्युमुखी पडत आहेत. सोनेवाडी डाऊच खुर्द येथे मोठ्या प्रमाणात गाई मृत्युमुखी पडल्या आहेत. या सर्व घटनेमुळे शेतकरी मात्र चिंतेत आहे.

ब्रेकिंग! चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिनेता संजय दत्त गंभीर जखमी

त्यामुळे शेतकऱ्यांनी गाई खरेदी करताना सावधानता बाळगावी शक्यतो उन्हाळ्यामध्ये गाई खरेदी करताना थोडं थांबावे. पावसाळा व हिवाळ्यात वातावरण थंड असतं अशावेळी गाई खरेदी करावी. उन्हाळ्यामध्ये आपल्याकडे उष्ण वातावरण असल्यामुळे गाईला वातावरण सहन होत नाही. त्यामुळे गाईचे मृत्यूचे प्रमाण हे वाढत आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी व दुग्ध व्यवसायकांनी काळजी घ्यावी.

“एकनाथ शिंदे मातोश्रीवर रडले! आदित्य ठाकरे यांनी केला मोठा गौप्यस्फोट

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *