
Crime News । छत्रपती संभाजीनगर : हल्ली गुन्ह्यांमध्ये (Crime) वाढ होत चालली आहे. वाढते गुन्हे रोखणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले आहे. तुम्ही संपत्तीसाठी झालेले वाद पाहिले असतील. सध्या एक खळबळजनक घटना घडली आहे. कर्जाला (Loan) कंटाळून एका मुलाने आपल्याच वडिलांना संपवल्याची घटना घडली आहे. (Latest marathi news)
Kailas Patil । मोठी बातमी! ठाकरे गटाच्या आमदाराला प्रचारसभेत आली भोवळ
मिळालेल्या माहितीनुसार, सातारा परिसरातील डीलक्स पार्क येथे ही घटना घडली आहे. रोहित श्रीकृष्ण पाटील असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. सोमवारी रात्री पाटील कुटुंबातील सर्वजण जेवण करून झोपले होते. सकाळी त्यांची मुलगी आवाजाने जागी झाली त्यावेळी पाटील यांचा मुलगा त्याच्या आईच्या अंगावर बसून गळा दाबत होता. मुलीने आरडाओरड करताच तो पळून गेला.
Sharad Pawar । शरद पवारांचा नवा डाव, अजित पवार गटाच्या बड्या नेत्याची घेतली भेट
हॉलमध्ये श्रीकृष्ण पाटील हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी जात पोलिसांनी तपास करत आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी करताच त्याने आपण कर्जबाजारीला कंटाळून हत्या केल्याची कबूली दिली. पोलिसांनी त्याला अटक केली असून, त्याच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
Baramati Loksabha । बारामतीच्या राजकारणात नवा ट्विस्ट, सुनंदा पवारांनी घेतला उमेदवारी अर्ज