महाराष्ट्रात खेड्यापासून शहरापर्यंत सर्वत्र गौतमी पाटीलचे चाहते आहेत. मागील काही महिन्यांपासून गौतमी पाटील सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. तिच्या एका मुलाखतीच्या व्हिडिओला लोकांकडून मोठी पसंती मिळत आहे. एका मुलाखतीदरम्यान गौतमी पाटीलने आपल्या जीवनसाथी बद्दल वक्तव्य केले होते. तिला कसा नवरा हवाय हे तिने यावेळी सांगितले होते.
Atik Ahmed Murder: पत्रकार बनून आले, गोळ्या झाडल्या, जय श्री रामाचा गजर केला अन् सरेंडरही केलं
मला पैसा, बंगला, गाडी याची हाव नाही. मला आयुष्यात कठीण काळ आल्यानंतर साथ देणारा जोडीदार हवा आहे. असे गौतमी पाटीलने म्हंटले होते. गौतमीच्या ( Gautami Patil) या प्रस्तावानंतर संपूर्ण महाराष्ट्रात याबद्दल चर्चा सुरू होती. दरम्यान बीडच्या ( Beed) एका मुलाने गौतमीला पत्र लिहिले आहे. हा मुलगा सामान्य शेतकरी घरातील असून त्याने गौतमीला लिहिलेले पत्र ( Letter to gautami) चांगलेच व्हायरल होत आहे.
गौतमी पाटीलचे हाल बेहाल आहेत. तिचे भरपूर चाहते आहेत. मात्र लग्नासाठी कोणीच तयार नाही. आमच्या महाराष्ट्रात घरात मुलगी जन्माला आली की, मुलाच्या घरचे मुलीच्या घराचे उंबरठे झिजवतात. तरी सुद्धा मुलाला मुलगी मिळत नाही. इथं तुझ्या ठुमक्यावर कित्येक लोक फिदा असून सुद्धा तुला जोडीदार मिळत नाही. म्हणून एकदा स्वतःचेच आत्मपरीक्षण कर. असा सल्ला या तरुणाने पत्रात दिला आहे.
मोठी बातमी! आज नागपूरमध्ये ‘मविआ’ची वज्रमूठ सभा; ‘हे’ दिग्गज नेते राहणार उपस्थित