सैराट, फँड्री, नाळ आणि झुंडच्या यशानंतर प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व लेखक नागराज मंजुळे यांचा घर बंदूक बिर्याणी हा नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटात आकाश ठोसर, सयाजी शिंदे, सायली पाटील हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. येत्या 7 एप्रिलला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
महिलेने ओव्हरटेक केल्याने व्यक्तीने तिला भरचौकात केली मारहाण; पाहा VIDEO
या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नागराज मंजुळे, आकाश ठोसर, सयाजी शिंदे, सायली पाटील हे महाराष्ट्र्भर दौरा करत आहे. आजदेखील ते कोल्हापूरदौऱ्यावर होते यावेळी पत्रकार परिषद आणि कॉलेज प्रमोशन करण्यामध्ये व्यस्त असताना आकाश ठोसरला एक वेगळा अनुभव आला आहे. त्याच्यासाठी एक दिव्यांग चाहता पत्रकार परिषद होईपर्यंत भर उन्हात थांबला होता. यावेळी पत्रकार परिषद होताच आकाशने चाहत्यासोबत फोटो सोबत फोटो आणि व्हिडिओ सुद्धा काढले. यावरून आकाशचे आपल्या चाहत्यांवरचे प्रेम आणि चाहत्याचे आकाशबद्दलचे प्रेम दिसून येत आहे.
दरम्यान, घर बंदूक बिरयानी’ चा ट्रेलर देखील प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरची सोशल मीडियावर तुफान चर्चा होताना दिसत आहे. चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर सोशल मीडियावर झळकला असून यामध्ये नागराज मंजुळे, सयाजी शिंदे, आकाश ठोसर आणि सायली पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पोलीस, डाकू यांच्यामध्ये चकमक झाल्याची पहायला मिळत आहे. त्यामुळे आता प्रेक्षक चित्रपट प्रदर्शित होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
रोहित पवारांना मोठा धक्का! बारामती ॲग्रो कारखान्यावर गुन्हा दाखल