सर्व नात्यांपेक्षा पती आणि पत्नीचे (Husband and Wife) नाते खूप वेगळे असते. एकमेकांच्या सुख-दुःखात ते नेहमी सोबत असतात. अनेकदा या दोघांमध्ये वाद होतात. परंतु बऱ्याच वेळा त्यांच्यातील वाद टोकालाही जातात. त्यामुळे रागाच्या भरात धक्कादायक घटना घडल्याचेही आपण पाहतो. अशीच काहीशी घटना समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे सर्वांचा धक्का बसला आहे. (Latest Marathi News)
मिळालेल्या माहितीनुसार ही धक्कादायक घटना नागपूरमध्ये (Nagpur) घडली आहे. अर्चना ही सतत फोनवर बोलत असल्याने तिच्या पतीला तिच्यावर संशय येत होता. त्यामुळे त्या दोघांमध्ये सतत वाद होत होते. याच वादातून एकदा ती पत्नी माहेरी निघून गेली होती. परंतु, सासरी परत आल्यानंतर पुन्हा त्या दोघांमध्ये वाद होऊ लागले. हाच राग डोक्यात ठेवून पतीने मध्यरात्रीच्या दरम्यान पत्नीच्या डोक्यात हातोडा घातला. (Crime News)
Kirit Somaiya । किरीट सोमय्यांनी दिली कथित अश्लील व्हायरल व्हिडिओवर पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…..
मार जिव्हारी बसल्याने यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती मिळताच नंदनवन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला असून आरोपी पतीला ताब्यात घेतले आहे. रमेश भारसकर असे आरोपी पतीचे नाव आहे. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांना खूप मोठा धक्का बसला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.
Sinhagad Fort । सिंहगडावर जाण्याच्या विचार करताय तर थांबा; त्या ठिकाणी दिसली धक्कादायक गोष्ट