Ruturaj Gaikwad : नुकत्याच पार पडलेल्या आयपीएलमध्ये ऋतुराज गायकवाडची क्रेझ आपल्याला पाहायला मिळाली. अजूनही त्याची क्रेझ कायम आहे. सध्या महाराष्ट्र प्रीमियर लीग सुरु आहे. यामध्ये ऋतुराजचा जलवा कायम आहे. या सामन्यादरम्यान त्याचा एक चाहता चक्क त्याच्या पाया पडला आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
मोठी बातमी! ठाकरे गटाच्या महिला नेत्यावर शाईफेक
पहिली लढत पुणेरी बाप्पा आणि कोल्हापूर टस्कर्स यांच्यात सुरु होती. पुणेरी बाप्पा संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. कोल्हापूर टस्कर्सने चांगली सुरुवात करत केदार जाधव आणि अंकित बावणे यांच्या जोडीने एकूण 48 चेंडूंत 65 धावांची सलामी दिली. परंतु,रोहन दामलेने केदार जाधवला बाद करत ही त्याला तंबूत पाठवले. कोल्हापूर संघाला 20 षटकांत 7 बाद 144 धावसंख्या गाठता आली. दरम्यान ऋतुराज गायकवाड आणि पवन शहा यांनी ठोकलेल्या धावांमुळे पुणेरी बाप्पा संघाचा कोल्हापूर टस्कर्सवर दणदणीत विजय झाला.
Kangana Ranaut। कंगना रणौतने केला मोठा खुलासा; म्हणाली, “लग्न करायची इच्छा आहे पण…”
परंतु, या सामन्यादरम्यानचा एक व्हिडिओ चांगला व्हायरल होत आहे. यात ऋतुराज फलंदाजी करत असताना एक चाहता त्याच्या पाया पडला. त्यानंतर हा चाहता लवकर बाहेर नव्हता येत. त्यामुळे त्याला बाहेर काढण्यासाठी सुरक्षारक्षकांना काही वेळ लागला. त्यानंतरही आणखी दोन चाहत्यांनी सामन्यात असाच अडथळा आणला.
धक्कादायक! नवऱ्यानं भररस्त्यात बायकोला पेट्रोल टाकून पेटवलं; थरकाप उडवणारी घटना