शेतकऱ्यांना ‘जगाचा पोशिंदा’ म्हणून ओळखले जाते. शेतकरी (Farmer) शेतात काबाडकष्ट करून पीक पिकवतात म्हणून आपण घरात बसून अन्न खातो. परंतु, शेतकऱ्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. सध्या कांद्याला दर नसल्याने शेतकरी काळजीत आहेत. अशातच एका कांदा ( Onion) उत्पादक शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसल्याची माहिती समोर आली आहे.
अभिनेत्री ह्रता दुर्गुळेची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल; पोस्ट शेअर करत म्हणाली…
एका शेतकऱ्यानं १० पोती कांदा व्यापाऱ्याला विकला त्यातून त्याला अवघे ५१२ रुपये आले त्यापैकी ५०९ रुपये वजा करुन घेत त्याला २.४९ रुपयांचं बील देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ही धक्कादायक माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी उघडकीस आणली आहे.
आत्ताची सर्वात मोठी बातमी! ‘मशाल’ चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टानं दिला मोठा निर्णय
राजेंद्र चव्हाण असं या कांदा उत्पादक शेतकऱ्याचं नाव असून या शेतकऱ्यानं ५१२ किलो कांदा व्यापाऱ्याला विकला. त्यावेळी त्या कांद्याचं बील १ रुपये दराप्रमाणं ५१२ रुपये झालं. यांनतर त्यासाठी लागलेली हमाली, तोलाई, भाडे, रोख उचल यासाठी त्यातील ५०९.५१ रुपये कापून घेण्यात आले. व शेतकऱ्याच्या हातात फक्त २ रुपयाचा चेक देण्यात आला. त्यामुळे या सर्व प्रकारामुळं राजू शेट्टी यांनी संताप व्यक्त केला आहे.
अरुंधती-आशुतोषने एकमेकांसाठी घेतला भन्नाट उखाणा; ऐकून तुम्हीही म्हणाल..