
यंदाच्या वर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे कापसाचे (Cotton) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बाजारात कापसाची आवक कमी झाल्याने कापसाला चांगला दर मिळत आहे. त्यामुळे शेतकरी समाधानी आहेत, पण शेतकऱ्यांचे हे समाधान काही चोरट्यां देखवले नाही. त्यामुळे आता चोरटयांनी कापूस चोरायला देखील सुरवात केली आहे. यामध्येच आता सोयगाव (Soygaon) तालुक्यात एका शेतकऱ्याचा 17 क्विंटल कापूस चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
‘हे’ जोडपे झाले ‘रातोरात मालामाल’! किचनच्या फरशीखाली सापडली जुनी नाणी
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोयगाव शिवारातील एका शेतकऱ्याने शेतातील वेचलेला २५ क्विंटल कापूस शेड मध्ये ठेवला होता. दरम्यान चोरट्यांनी मध्यरात्री या शेडमधून साठवून ठेवलेल्या कापसापैकी एक लाखाचा 17 क्विंटल कापूस चोरून नेला. सकाळी शेतकऱ्याने शेड उघडून पहिले असता कापूस चोरीला गेल्याचे शेतकऱ्याच्या लक्षात आले.
स्टिंग मॅगीचा ‘हा’ प्रकार तुम्हाला माहित आहे का? व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल
आता याप्रकरणी सोयगाव पोलिस Soygaon Police) स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता या घटनेचा पुढील तपास पोलीस यंत्रणा (Police System) करत आहे. मात्र या घटनेमुळे पुन्हा शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
“…म्हणून कार्यक्रम सुरू असतानाच शरद पवार झाले भावूक”; काय झाले असेल? वाचा सविस्तर