शेतकरी आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावून कष्ट करत असतो. स्वतःच एखाद घर तयार करण्यासाठी तो रात्रंदिवस कष्ट करत असतो. मात्र एवढ्या कष्टाने बनवलेले घर जर एका रात्रीत संपलं तर त्या शेतकऱ्याची काय अवस्था होत असेल याचा कोणी विचारही करू शकत नाही. दरम्यान, काल सायंकाळी बुलढाणा (buldhana) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे.
बुलढाणा शहरा जवळच्या कोलवड (kolvad) या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. एका शेतातील घराला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये घर संपूर्ण जाळून खाक झाले आहे. माहितीनुसार, कोलवड या ठिकाणच्या एका शेतकऱ्याने त्याच्या शेतामध्ये घर बांधले होते. या शेतातील घराला काल सायंकाळी अचानक भीषण आग लागली आणि संपूर्ण घर या आगीमध्ये जाळून खाक झाले आहे. यामुळे शेतकऱ्याला मोठा धक्का बसला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, सुदैवाने ज्यावेळी आग लागली त्यावेळी घरामध्ये कोणीही उपस्थित नव्हते त्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. धोंडूबा गायकवाड असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ही आग एवढी भीषण होती की या घरातील संपूर्ण वस्तू देखील जाळून खाक झाल्या आहेत. ही आग नेमकी कशामुळे लागली याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र यामुळे शेतकऱ्याचा संसार उघड्यावर आला आहे.
Ajit Pawar | त्र्यंबकेश्वर प्रकरणावरून अजित पवार संतापले; म्हणाले, अशा घटना…”