Site icon e लोकहित | Marathi News

50 गुंठ्यात 120 टन ऊसाचे उत्पादन काढून शेतकऱ्याचा विक्रम; वाचा सविस्तर

A farmer's record for producing 120 tonnes of sugarcane in 50 bunches; Read in detail

ऊस हे नगदी पीक राज्यात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. उसासाठी शेतकऱ्यांचे भांडवल जाते परंतु त्याचा मोबदला देखील त्याच प्रमाणात मिळतो. यामुळे ऊस उत्पादन शेतकऱ्यांना परवडू लागले आहे. अशातच सरकारने ऊस उत्पादक (Sugarcan Farmer) शेतकऱ्यांच्या मागण्या सुद्धा मान्य केल्याने शेतकऱ्यांसाठी ऊस उत्पादन घेणे सोप्पे झाले आहे. दरम्यान महळूंगे पडवळ (ता.आंबेगाव) या गावातील शेतकरी राजेंद्र नरहरी आवटे यांनी कमी जागेत जास्त उत्पादन काढून आदर्श निर्माण केला आहे.

बिग ब्रेकिंग! बेळगावमध्ये महाराष्ट्रातील वाहनांवर दगडफेक

या शेतकऱ्याने फक्त 50 गुंठ्यांत 120 टन ऊसाचे उत्पादन घेऊन इतर शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे. आवटे यांनी त्यांच्या शेतात एकात्मिक खत व्यवस्थापनाचा प्रयोग केला आहे. या प्रयोगातून त्यांनी 86032 जातीच्या ऊसाचे 120 टन उत्पादन घेतले आहे. त्यांच्या या प्रयोगाची चर्चा सध्या सर्वत्र सुरू झाली आहे. राजेंद्र आवटे (Rajendra Awte) यांनी नियोजनबद्ध पद्धतीने शेती केल्याने त्यांना एवढा मोठा फायदा झाला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील 18 गावं कर्नाटकात जाण्यास उत्सुक

यासाठी त्यांनी ऊस लागवड झाल्यानंतर 15 दिवसांची लायकोसिन, युरिया, उकिली ही औषधे प्रमाणित घेऊन आळवणी केली होती. यानंतर 20 दिवसांनी पुन्हा युरिया व बडसूटर यांची आळवणी केली. यामुळे एका खुटातून 8 च्या पुढे फुटवे निघाले होते. याशिवाय आवटे यांनी उसासाठी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामार्फत दिल्या जाणार्‍या अ‍ॅझोफॉसफो, अ‍ॅसिटोबॅकर यांसारख्या जैविक खतांचा वापर केला होता.

मोठी बातमी! दुधाच्या दरात पुन्हा ३ रुपयांनी दरवाढ

Spread the love
Exit mobile version