अजकाल लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सोलापूरात ‘आम्हाला बायको मिळवून द्या’ असा मोर्चा देखील काढण्यात आला होता. ग्रामीण भागातील मुलांना लग्नासाठी मुली ( Girl for Marriage) मिळत नाही हा प्रश्न आजकाल गंभीर होत चालला आहे. या पार्श्वभूमीवर एका लग्नाळू मुलाने चक्क आमदारालाच कॉल लावून ‘तुमच्या मतदार संघातील मुलगी लग्नासाठी शोधून द्या’ अशी मागणी केली आहे. या कॉलचे रेकॉर्डिंग सध्या व्हायरल होत आहे.
एक वक्तव्य आणि नितीश कुमार पुरते अडकले; म्हणाले, “आम्ही पुरुष रोज लैंगिक संबंध ठेवतो परंतु,..”
खुल्ताबाद तालुक्यातील एका तरूणाने औरंगाबाद ( Aurangabad) जिल्ह्यात कन्नड मतदारसंघाचे ठाकरे गटाचे आमदार उदयसिंह राजपूत यांना अचानक फोन केला. यावेळी त्याने राजपूत यांना घरची सर्व परिस्थिती उत्तम असल्याचे सांगत आठ एकर शेती असल्याची माहिती दिली आहे. मात्र तरीदेखील आपल्याला लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याचं दुखः त्याने आमदारांजवळ व्यक्त केले आहे. यापुढे जाऊन या तरुणाने तुमच्या सर्कलमध्ये मुली असतील तर पहा ना अशी मागणी केलीय. यावर राजपूत यांनी देखील तरुणाला नाराज न करता, बायोडाटा पाठवून द्या, मी बघतो म्हणत आश्वासन दिले आहे.
शिवसेनेतून बाहेर पडणं सोप्प न्हवतं; गिरीश महाजन यांची कबुली! मिशन फेल होईल याचीही वाटली होती भीती…
या संभाषणाची ऑडीओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ही घटना हसू आणणारी असली तरी समस्या मात्र गंभीर आहे. बेरोजगारी, लिंग गुणोत्तरात असलेली तफावत आणि मुलींच्या पालकांच्या वाढीव अपेक्षा यामुळे मुलांसाठी नवरी मुलगी मिळणे अवघड झाले आहे.
प्रवीण तरडे यांची मोठी घोषणा! मुळशी पॅटर्नचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार