राज्यात यंदा देखील अवकाळी पाऊस पडला. यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. दरम्यान अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांना सरकार कडून पीक नुकसानीची रक्कम मिळालेली नाही. याशिवाय अनेक घटनांमधून राज्यातील शेतकरी सरकारवर खुश नाहीत हे वेळोवेळी दिसून येत आहे. अशातच एका शेतकरी पुत्राने स्वतःच्या रक्ताने सरकारला पत्र ( Letter to Government) लिहिले आहे. या मुलाचे नाव श्रीकांत गदळे असे असून तो बीडचा (Beed) आहे. ( Farmers son wrote letter to government by his blood)
Rishabh Pant: ऋषभ पंतच्या चाहत्यांसाठी समोर आली धक्कादायक बातमी
श्रीकांतने राज्याचे राज्यपाल रमेश बैस ( Ramesh Bais) यांना पत्र लिहीत आपले दुःख मांडले आहे. यामध्ये तो लिहितो की, आतापर्यंत शेतकऱ्याची व्यथा लिहून-लिहून पेनाची शाई संपून गेली. लोकशाहीच्या या जगात शेतकऱ्याच्या पत्राला किंमत नाही, यामुळे मी किसान पुत्र श्रीकांत गदळे स्वतःच्या रक्ताने हे पत्र लिहितोय. माझ्या रक्ताला तरी लोकशाही जगात किंमत आहे का? या किसान पुत्राचा राज्यपालांना एक प्रश्न आहे की, जर राज्यातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे सर्वगुण संपन्न असतील तर राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या बंद का होत नाहीत?
‘या’ कारणामुळे उर्फी जावेदला मुंबई मधील रेस्टॉरंटमध्ये प्रवेश नाही; वाचून बसेल धक्का
राज्यात नवीन राज्यपाल आले मग त्यांना जूने प्रश्न सोडवता येणार का? असा सवाल श्रीकांत गदळे यांनी त्यांच्या पत्रातून विचारला आहे. आम्हाला अनुदानाची भीक नको. आमच्या शेतीमालाला योग्य भाव दया. अशी मागणीही श्रीकांत गदळे यांनी यावेळी केली आहे. तुम्ही मला आमदार करा मी शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करतो आणि खऱ्या अर्थाने कृषी प्रधान देश बनवतो. असा आशय असलेले पत्र श्रीकांत यांनी बीडच्या जिल्ह्याधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले आहे.
आनंदाची बातमी! घरकुल योजनेतील लोकांना मिळणार मोफत वाळू; नवीन शासन निर्णय जारी