मुंबई : आपण नेहमी पाहत असतो की सोशल मीडियावर (Social media) रोज काहीना काही व्हायरल होत असतात. दरम्यान अशातच मध्यप्रदेशमधील(MP) एका सायकल रिक्षाचालकाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक व्यक्ती आपल्या लहान मुलाला कडेवर घेऊन रिक्षा चालवत असल्याचं दिसत आहे. राजेश (Rajesh) असं या व्यक्तीचं नाव आहे.हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत असून लोकांकडून सहानुभूतीच्या प्रतिक्रिया (comments) येत आहेत.तसेच असा संघर्ष कुणाच्या वाट्याला येऊ नये अशा कमेंट्स नेटकऱ्यांकडून केल्या जात आहेत.
Ramdas Athawale: ‘या’ महिन्यात होणार महापालिका निवडणुका, आठवलेंनी सांगितली महत्वाची माहिती
NDA/NA II परीक्षेची तयारी करताय? तर जाणून घ्या ‘हे’ नवे नियम
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपलंही मन गहिवरून आल्याशिवाय राहणार नाही.या व्हिडिओतील राजेशने सांगितले की , मुलांना संभाळण्यासाठी पैसे नसल्यामुळे त्यांना सोबत घेऊन काम करावं लागत आहे.या मुलापेक्षा मोठी एक मुलगी राजेशला आहे. तिला घरी झोपवून या लहान बाळाला खांद्यावर घेऊन हा रिक्षा चालवत असल्याचं त्याने सांगितलं आहे. कपडे न घातलेल्या अवस्थेतील लहान लेकरू एका हाताने खांद्यावर घेतलेल्या राजेशला अनेकांनी मदत करण्याचे अवाहन केले आहे.
NDA/NA II परीक्षेची तयारी करताय? तर जाणून घ्या ‘हे’ नवे नियम