
हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला (Shimla) येथे मुसळधार पावसाने कहर केला आहे. मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये भूस्खलनाच्या घटनांमध्ये अचानक वाढ झाली असून त्यामुळे संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासंबंधीचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये मंडीच्या थुनाग मार्केटमध्ये पावसाचे पाणी डोंगरातून रस्त्यावर वाहत असल्याचे दिसत आहे. (Rain Update)
बारामतीत सुप्रिया सुळे-पार्थ पवार आमने सामने? पवार कुटुंबातील व्यक्तीने दिले ‘हे’ उत्तर
मंडी जिल्ह्यातील ओनैर गावातील थुनाग बाजारातील घाणेरड्या पावसाच्या पाण्याने झाडांचे मोठे खोडे वाहून गेल्याने अनेक घरे आणि दुकानांचे नुकसान झाले आहे. या व्हिडीओमध्ये थुनाग मार्केटमध्ये पावसामुळे निर्माण झालेले भीषण दृश्य पाहायला मिळत आहे.
भीषण अपघात! देवदर्शन करुन घरी येताना काळाने घातला घाला, २ जणांचा मृत्यू तर ७ जण जखमी
यामध्ये तुम्ही पाहू शकता की, कोणाचे घर, झाडे सगळे वाहून गेलेले दिसतात. याबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले की, परिसरात मुसळधार पाऊस सुरू असताना ढगफुटीमुळे अचानक पूर आला आहे. गावात मोठमोठ्या फांद्या पडल्याने अनेक झाडेही उन्मळून पडली. हा रस्ता बंद करण्यात आला असून मलबा हटवण्याचे काम सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पाण्यात बुडालेल्या ‘त्या’ तरुणांना शोधण्यासाठी सोडले कॅमेरे, रेस्क्यू टीमला एक मृतदेह शोधण्यात यश