दिल्ली येथे लिव्ह इन रिलेशनशीप राहत असणाऱ्या श्रद्धा या तरुणीच्या हत्येने देशात सध्या गोंधळ सुरू आहे. ( Delhi crime) श्रद्धा सोबत राहणाऱ्या आफताब या तरूणानेच तिची हत्या केल्याने वेगवेगळ्या स्तरांतून लिव्ह इन रिलेशनशिप ( Live in relationship) वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. आफताबने श्रद्धाची फक्त हत्याच केली नाही तर हत्या केल्यानंतर तिच्या शरीराचे तुकडे करून जंगलात फेकले आहेत.
पीएम किसान योजना तुन कोट्यवधी लोकांना वगळले; जाणून घ्या, कोणाला मिळणार नाही योजनेचा पुढचा हप्ता
हत्या झालेली श्रद्धा वालकर ही तरुणी मूळची मुंबईची असून ती आपला प्रियकर आफताब सोबत दिल्ली येथे राहत होती. यावेळी श्रद्धा ने आफताबच्या मागे लग्नासाठी तगादा लावल्याने आफताबने तिची हत्या केली. हत्या केल्यानंतर त्याने तिच्या शरीराचे 30 च्या वर तुकडे करून स्वतःच्या घरात फ्रीजमध्ये ठेवले. यानंतर कित्येक दिवस तो ते तुकडे मुंबईतील ( Mumbai) जंगलात न्हेऊन फेकत होता. इतकच नाही तर तिथे दुर्गंधी पसरू नये म्हणून अगरबत्ती देखील लावत होता. अशी माहिती आफताब च्या जबाबातून समोर आली आहे.
धक्कादायक! गाडी दरीत कोसळून १२ जणांचा जागीच मृत्यू; वाचा सविस्तर
या प्रकरणानंतर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. आफताबला फाशीची शिक्षा देण्यात यावी, याची देखील मागणी करण्यात येत आहे. अनेक राजकीय व्यक्ती तसेच कलाकारांनी देखील या घटनेवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता आणखी एका चित्रपट दिग्दर्शकाने या हत्याकांडावर चित्रपट बनवण्याची घोषणा देखील केली. त्यामूळे बॉलिवूडमध्ये याप्रकरणावर चित्रपट बनविण्यात येणार असल्याची घोषणा देखील करण्यात आली आहे.
भटक्या कुत्र्यांवर विषप्रयोग कृत्य करण्याऱ्यांवर होणार कारवाई; वाचा सविस्तर