
ड्रामा क्वीन ( Drama Queen) म्हणून राखी सावंतची सर्वदूर ओळख आहे. सतत चर्चेत असणाऱ्या राखी सावंतची बॉलिवूड मध्ये एक आगळी वेगळी ओळख आहे. मराठी बिगबॉसच्या नुकत्याच झालेल्या सिझन मधून बाहेर पडल्यापासून राखी सावंत तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.
हृतिक रोशन लवकरच अडकणार विवाहबंधनात? लग्नानंतर राहण्यासाठी घेतले नवीन घर
राखीचा ( Rakhi Sawant) पती आदिल खान यावर राखीने गंभीर आरोप केले होते. तो सध्या तुरुंगात आहे. त्याच्यावर मारहाण, फसवणूक व अश्लील व्हिडिओ बनवण्याचे आरोप आहेत. अशातच राखीच्या भाऊ राकेश सावंतने एक मोठी बातमी दिली आहे.
पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर साधला निशाणा; म्हणाल्या, “चारित्र्यहीन व्यक्ती राजकारणातील व्हिलन…”
लवकरच राखीच्या आयुष्यावर एक चित्रपट येणार असल्याचे त्याने सांगितले आहे. राखीच्या या चित्रपटाचे नाव राऊडी राखी असे असणार असून त्याचे दिग्दर्शन राखीचा भाऊ करणार आहे. तसेच गौरव अग्रवाल या चित्रपटाची निर्मती करणार आहे.
नागराज मंजुळेंच्या अजून एका नवीन गाण्याने सोशल मीडियावर घातला धुमाकूळ; पाहा VIDEO
यावेळी तो म्हणाला की, “राखी सावंत ही राऊडी आहे. आयुष्यात अडथळे निर्माण करणाऱ्या कोणालाच ती सोडत नाही. म्हणूनच मी तिच्या आयुष्यावर सिनेमा बनवणार आहे. सध्या राखी तिचा पती आदिल खानविरोधात लढा देत आहे. तसेच राखीने तिच्या आयुष्यात अनेक कठीण प्रसंगांचा सामना केला आहे. म्हणून मी रखीवर चित्रपट बनवणार आहे.”
“एका महिलेने चिंचवडमध्ये पाडलं”, निलेश राणे यांची अजित पवारांवर जोरदार टीका