भीमाशंकर : राज्यामध्ये सध्या बस (bus) दुर्घटनेचे प्रमाण खूप वाढले आहे. यामध्ये आता अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भीमाशंकरला (Bhimashankar) जाणाऱ्या एका खासगी बसला आग लागल्याची घटना समोर आली आहे. मंचर-भीमाशंकर रोडवर ही घटना घडली आहे. या घटनेने आसपासच्या परिसरात खळबळ उडाली आहे.
सकाळी ७ च्या सुमारास ही घटना घडली असून बस जळून खाक झाली आहे. सुदैवाने यामधील सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती समोर आली आहे. जवळपास बसमध्ये २९ प्रवाशी असून भीमाशंकर येथे दर्शनासाठी चालले होते.
राज्य सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील 15 हजार शाळा होणार बंद
दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बसला आग लागतच तिथल्या स्थानिक लोकांनी व पोलिसांनी सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. व मोठी दुर्घटना टळली. दरम्यान मागच्या काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये देखील असाच अपघात झाला होता.
Siddharth-Kiara: ठरलं! सिद्धार्थ-कियारा ‘या’ दिवशी करणार लग्न? तारीख आली समोर