मित्राचा वाढदिवस (Birthday) म्हंटल की मुलं नेहमी काहीतरी वेगळं करत असतात. ते कधी मित्राच्या अंगावर अंडे फोडतात तर कधी मित्राच्या संपूर्ण तोंडाला केक लावतात. मित्राच्या वाढदिवानिमित्तचे अनेक गमतीशीर व्हिडीओ सोशल मीडियावर कायम व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका मित्राने दुसऱ्या मित्रासाठी केले आणला आहे. यामध्ये बिर्थडे बॉय केक कापायला जातो आणि तेवढ्यात दुसरा त्याच्या अंगावर स्प्रे मारायला जातो मात्र घडत असं की तो स्वतःवरच स्प्रे मारून घेतो. स्प्रेच तोंड त्याच्याकडे वळलेल असल्यामुळे बिर्थडे बॉय ऐवजी स्वतःवरच स्प्रे मारून घेतो.
अन्नू कपूर यांच्या प्रकृतीबाबत समोर आली सर्वात मोठी अपडेट!
हा व्हिडीओ c_r_a_z_y_killer__या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर नेटकरी वेगेवगेळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले की “जो व्यक्ती दुसऱ्यासाठी खड्डा खोदतो तो स्वत: त्यात पडतो. ”तर दुसऱ्या युजरने लिहिलं की “भाऊ असं का करतो.” अशा अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया या व्हिडिओवर येत आहेत.