भारतात सर्वात लोकप्रिय खेळ कोणता असेल तो क्रिकेट. त्यामुळे क्रिकेटचे (cricket) चाहतेदेखील सर्वाधिक आहेत. फक्त क्रिकेटच नाही तर भारतीय क्रिकेटपटूंची क्रेझ देखील चाहत्यांना आकर्षित करत असते. सोशल मीडियावर क्रिकेटर्सना जितके चाहते ट्रोल करतात, तितकेच ते त्यांच्यावर प्रेम देखील करतात. परंतु खेळाडूवरील (cricketers) या प्रेमसाठी एका चाहत्याने आपल्या मित्राचा जीवच (murder) घेतला आहे. ही घटना तामिळनाडूच्या (Tamilnadu) अरियालूर जिल्ह्यात घडली असून या घटनेने सर्वत्र खळबळ माजली आहे.
‘या’ जिल्ह्यात पिकतोय महागडा काळा तांदूळ, आसाममधून बियाणे आणून केला प्रयोग
नेमक प्रकरण काय आहे
तामिळनाडूच्या अरियालूर जिल्ह्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली (Rohit Sharma And Virat Kohli) यांना शिवी दिल्यामुळे एका तरुणाने आपल्या मित्राची हत्या केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणाचा मित्र विराट कोहली आणि रोहित शर्माबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरत होता. यावरून तरुणाला खूप राग आला. दरम्यान या रागाच्याभरात त्याने आपल्या मित्राची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या केली. दरम्यान हा प्रकार दारूच्या नशेत असताना घडला असल्याचे सांगितले जात आहे. विघ्नेश असे मृत तरूणाचे नाव असून धर्मराज असे मारेकऱ्याचे नाव आहे.
दिल्लीच्या कॅनॉट प्लेसमध्ये मुलीचा दोरीच्या उडीचा पराक्रम, पाहा व्हायरल VIDEO
या वादाची सुरवात अशी झाली की तीन मित्र गावाजवळच्या जंगल परिसरात एकत्र दारू पिले .दारू पिताना झालेल्या वादानंतर धर्मराजने विघ्नेशची निघृण हत्या केली. त्यानंतर धर्मराजने तिथून पळ काढला. परंतु पोलिसांना धर्मराजला पकडण्यात पोलिसांना यश आले. तपासादरम्यान धर्मराजने पोलिसांना आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. तपासादरम्यान धर्मराजने सांगितले की, “आमच्यात क्रिकेटविषयी चर्चा झाली होती. यावेळी विघ्नेशने क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना शिवीगाळ केली. ही शिवीगाळ सहन न झाल्याने मी त्याची हत्या केली.”पत्र’ मिळाले आहे.
Shiv Thackeray: “माझ्या १६९ गर्लफ्रेंड होत्या”, शिव ठाकरेने केला मोठा खुलासा