शेतकरी मुलगा म्हंटल की आजकाल लग्नाचे अवघड झाले आहे. दिवसेंदिवस मुलींच्या लग्नासाठीच्या अपेक्षा वाढत आहेत. यामुळे शेतकरी मुलांचे लग्न होणे अवघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी ( H D Kumar Swami) यांनी मोठी घोषणा केली आहे. कर्नाटक विधानसभेची निवडणूक येत्या 10 मे ला होणार असून या निवडणुकीपूर्वी कुमारस्वामी यांनी मोठी घोषणा केली आहे.
गौतमी पाटील आणि इंदुरीकर महाराज दोघांनाही लोक नाव ठेवतात; ज्येष्ठ साहित्यिकाची जोरदार टीका
एच डी कुमारस्वामी यांचा जनता दल पक्ष सत्तेत आल्यास शेतकऱ्यांशी व शेतकऱ्यांच्या मुलांशी लग्न करणाऱ्या मुलींना दोन लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. कोलार येथील पंचरत्न रॅलीमध्ये ( Panchratn rally in karnataka) कुमारस्वामी यांनी ही घोषणा केली आहे.
“…तर आमदार, खासदारांना मारा”; प्रकाश आंबेडकर यांच खळबळजनक वक्तव्य
यावेळी बोलताना कुमारस्वामी म्हणाले की, आजकाल मुली शेतकऱ्यांच्या मुलांशी लग्न करण्यास तयार नाहीत. यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. जी मुलगी शेतकऱ्यांच्या मुलाशी लग्न करेल त्या मुलीला दोन लाख रुपये दिले जातील. अशी योजना आणली जाणार आहे. शेतकरी कुटुंबातील तरुणांसाठी ही योजना फायदेशीर असणार आहे.
पंजाब हरियाणा मधून आणलेल्या गाईचा उन्हाळ्यामुळे होतोय मृत्यू