भारत हा कृषिप्रधान (agrarian) देश आहे. देशात शेतीला पूरक व्यवसाय म्हणून ग्रामीण भागातील शेतकरी (Farmers) दुग्धव्यवसाय करतात. या व्यवसायातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होतो. दुग्धव्यवसाय (Dairying) हा शेतकऱ्यांसाठी आर्थिक (Financial) उत्पन्नाचा एक मोठा स्रोत ठरत आहे. जर तुम्हाला कमी खर्चात या व्यवसायात चांगला नफा मिळवायचा असेल तर तो डेअरी फार्म व्यवसायातून मिळेल. यासाठी तुम्हाला फक्त तेच प्राणी हवे आहेत जे दूध देतात. महत्वाची बाब म्हणजे डेअरी फार्म सुरू करण्यासाठी सरकार तुम्हाला आर्थिक मदतही करते.
कांदा उत्पादकांची दिवाळी, खरीप कांदा मुहूर्ताला मिळाला ‘इतका’ उच्चांकी भाव
महिन्याला लाखो रुपये कमवू शकता
दुग्धव्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्ही गाय, म्हशीच्या चांगल्या जातींची निवड करणे सर्वात महत्त्वाचे आहे. तसेच प्राण्यांच्या गोठ्यासाठी मोकळी हवा असेल अशीच जागा निवडा. तसेच दुग्धव्यवसायातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे शेतकरी शेण ते दूध विकून महिन्याला लाखो रुपये कमवत आहेत. याशिवाय गायी म्हशींचे शेण सेंद्रिय खत (Organic Fertilizer) बनवण्यासाठीही वापरता येते. तसेच दुधापासून अनेक प्रकारचे म्हणजे पदार्थ बनवले जातात. ज्याच्या विक्रीतून चांगलाच नफा मिळतो.
Ranbir-Rashmika: सेटवर असं काय केलं रणबीरने? रश्मीका मंदानाला कोसळले रडू
बजेटनुसार हा व्यवसाय सुरू करू शकता
दुग्धव्यवसाय सुरू करण्यासाठी जास्त पैशांची आवश्यकता नसते. तुम्ही तुमच्या बजेटनुसार हा व्यवसाय सुरू करू शकता. जर शेतकऱ्याला एका प्राण्याकडून दररोज 10 लिटर दूध मिळत असेल. दरम्यान याचवेळी जर तुमच्याकडे 20 गायी आणि म्हशी असतील तर तुम्हाला 200 लिटर दूध मिळते. महत्वाची बाब जर तुम्ही हेच दूध बाजारात 50 रुपये प्रति लिटरने विकले तर तुम्हाला दररोज 10 हजार रुपये मिळू शकतात. आणि हाच हिशोब पुढे म्हणजे तुम्हाला एका महिन्यात तुम्हाला तीन लाख रुपये सहज मिळू शकतात. आता या तीन लखांमधले एक लाख जनावरांच्या काळजीसाठी खर्च केला तरीही तुम्हाला 2 लाख रुपयांचा फायदा होईल.
विद्युत तारेच्या करंटने एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू
डेअरी फार्मसाठी अनुदान उपलब्ध
महत्वाची बाब म्हणजे जर कोणी डेअरी फार्म उघडण्यास इच्छुक असेल, तर त्यासाठी नाबार्ड योजनेंतर्गत 35 टक्के पर्यंत अनुदान देते. तसेच समान कामासाठी ST/SC शेतकऱ्यांना 33.33 टक्के पर्यंत अनुदान दिले जाते. विशेष म्हणजे या नाबार्डच्या योजनेसाठी शेतकरी, वैयक्तिक उद्योजक, स्वयंसेवी संस्था, कंपन्या अर्ज करू शकतात.
मोठी बातमी! दहीहंडी फोडताना जखमी झालेल्या प्रथमेशचे निधन! केईएम रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास