Gold Silver Rate Today । खरेदीची ‘सुवर्ण’ संधी! सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण, पहा नवीनतम दर

Gold Silver Rate Today

Gold Silver Rate Today । तुळशीच्या लग्नानंतर आता सगळीकडे विवाहाचा धुमधडाका उडाल्याचे पाहायला मिळत आहे, सर्वत्र लग्नसराईची घाई सुरु आहे. जर तुम्ही या काळात सोने किंवा चांदी (Gold Silver Rate) खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण या दोन्ही धातूचे दर खूप कमी (Gold Silver Rate Falls Down) झाले आहेत. तुम्हाला पूर्वीपेक्षा कमी पैसे देऊन दागिने खरेदी करता येईल. यामुळे तुमची हजारोंची बचत होईल. (Latest Marathi News)

Viral News । कुत्रा बनण्यासाठी एका व्यक्तीने खर्च केले तब्बल 12 लाख रुपये, कारण वाचून बसेल धक्का

दरम्यान, मागील तीन आठवड्यात सोने (Gold Rate) आणि चांदीच्या किंमतीत (Silver Rate) मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. परंतु, काल हे दर (Gold Silver Price) झपाट्याने कमी झाले. त्यामुळे खरेदीदारांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सोन्याने 65 हजारांचा टप्पा ओलांडला असून इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (Indian Bullion and Jewelers Association) यावर्षी 4 मे 2023 रोजी 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 61,646 रुपये होती.

Cyclone Michong । मिचॉन्ग गेला पण प्रभाव कायम, 17 मृत्यू, वीज गायब, पाणी साचले, चेन्नईची परिस्थिती अजूनही भयानक

सोन्याच्या दरात घसरण

परंतु, 28 नोव्हेंबर, 1 डिसेंबर रोजी सोन्याने नवा विक्रम केला. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दर 62,728 रुपये झाले आहेत. 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 63,281 रुपयांवर पोहचली असून चांदी 76,430 रुपये किलो झाली होती. काही शहरात हे दर 78,000 रुपयांच्या घरात होते. या महिन्यात 5 डिसेंबर रोजी सोन्यात एक हजारांची घसरण झाली असून गुडरिटर्न्सनुसार 22 कॅरेट सोने 58,000 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचे दर 63,260 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

Sharad Pawar । शरद पवार यांना मोठा धक्का! निकटवर्तीयाला न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन नामंजूर

या डिसेंबर महिन्यात चांदीच्या दरात 1300 रुपयांची वाढ झाली आहे तर मागील आठवड्यात चांदी 2300 रुपयांनी चमकली होती. 5 डिसेंबर रोजी चांदीमध्ये 2 हजारांची घसरण झाली असून आता गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचे दर 78,500 रुपये इतके आहे.

Breaking News । महाराष्ट्रातील शाळांच्या वेळा बदलणार? पाहा नेमकं काय म्हणाले राज्यपाल?

Spread the love