सगळीकडे होळीचा (Holi) उत्सव मोठ्या आनंदात साजरा होत आहे. देशाच्या विविध भागामध्ये होळी वेगेवेगळ्या प्रकारे साजरी केली जाते. रंगांची उधळण करत होळी मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. तर काही गावामध्ये काही वेगळ्या पद्धती असतात त्यामुळे त्या गावात वेगळ्या पद्धतीने होळी साजरी केली जाते. आपल्या भारतात असे एक गाव आहे ज्या गावामध्ये गेली ७० वर्ष होलिका दहन केलं जात नाही. चलातर मग जाणून घेऊया या गावाबद्दल माहिती.
चक्क गावाचं काढले विक्रीला; नाशिक जिल्ह्यातील ‘या’ गावातील लोकांनी घेतला टोकाचा निर्णय
राजस्थानातल्या हर्णी (Harni is a village in Rajasthan) या गावामध्ये ७० वर्षापूर्वी होलिका दहनावेळी भीषण आग लागली होती. ही आग एवढी भीषण होती की, या आगीमध्ये लहान मुलांसह अनेक लोकांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेने गावातील नागरिक घाबरले होते. यामुळे गावातील नागरिकांनी मोठा निर्णय घेतला आणि तेव्हापासून या गावामध्ये होलिका दहन केले जात नाही.
पुढील २४ तासात ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता, यामध्ये तुमचा जिल्हा आहे का? वाचा एका क्लिकवर
यादिवशी होलिका दहन करत नसले तरी वेगळं काहीतरी करायचं म्हणून या गावातील लोक होलिका दहनाच्या दिवशी ग्रामस्वच्छता करतात. त्यावेळी घेतलेला निर्णय आजही पळाला जातो. या निर्णयामुळे गाव साफ होतं आणि रोगांपासूनnगावकरी दूर राहातात आणि उत्तम आरोग्य जगतात. त्यामुळे सध्या या गावाची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
‘या’ गावामध्ये होळीच्या दिवशी दगड फेकून मारले जातात; जाणून घ्या अनोख्या गावाबद्दल माहिती