कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याच्या घटना सतत घडत असतात. शक्यतो कौटुंबिक वादातून आत्महत्या करण्याचे महिलांचे प्रमाण जास्त आहे. सध्या देखील एक धक्कदायक घटना समोर आली आहे. या घटनेबद्दल वाचून तुम्ही देखील थक्क व्हाल.
अभिनेत्री अलका कुबल यांचा ‘तो’ फोटो व्हायरल; पाहा Photo
मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यातुन सध्या एक हृदय पिळवून टाकणारी घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून एका 30 वर्षीय महिलेने चार मुलांसह विहिरीत उडी घेतल्याची धक्कदायक घटना घडली आहे. ही घटना काल रविवारी घडली आहे. माहितीनुसार, या घटनेमध्ये महिलेच्या तीन मुलांचा मृत्यू झाला आहे, तर महिला आणि तिची एक मुलगी या घटनेमध्ये वाचली आहे.
थंड पाण्यात पोहणं फायद्याचं की तोट्याचं? जाणून घ्या संशोधकाचं मत
घटना घडली अशी की, महिलेले कौटुंबिक वादातून रागाच्या भरात आपल्या चार मुलांना घेऊन विहिरीत मारली. मात्र त्यांनतर ती विहिरीत घाबरली आणि बाहेर येण्याचा प्रयत्न करू लागली. यादरम्यान महिला तिच्या एका मुलीला घेऊन दोरीच्या साह्याने बाहेर आली मात्र महिलेच्या तीन मुलांचा मृत्यू झाला. आता या संपूर्ण प्रकरणाचा पोलीस यंत्रणा तपास करत आहे. या घटनेमुळे तेथील परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अंबादास दानवे शिंदे गटात प्रवेश करणार? शिरसाट स्पष्टच बोलले…