
पुण्यामध्ये (Pune) आग लागल्याची एक भयंकर घटना घडली आहे. कर्वेनगरमधील (Karve Nagar) एका भंगाराच्या दुकानाला प्रचंड आग लागली असून त्या आगेमध्ये संपूर्ण दुकान खाक झालं आहे. संपूर्ण परिसरात धुराचं सावट पसरलं आहे. ही आग नेमकी लागली, का लावली गेली, यावर शंका उपस्थित केली जात आहे.
Accident | समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात; तीन जणांचा मृत्यू
ही भीषण आग दुधाणे लॉन्स नावाच्या भंगारच्या दुकानाला लागली आहे. दुकानातील सर्व सामान जाळून खाक झाले आहे. त्यामध्ये जुने टीव्ही, फ्रिज आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, सर्वच खाक झाल्यामुळे दुकानदारांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. या भीषण आगेत एका फ्रिजचा कॉम्प्रेसर फुटला आणि त्यामुळे खूप मोठा आवाज झाला. परंतु सुदैवाने या ठिकाणी कोणाचाही मृत्यू झाला नाही.
देवेंद्र फडणवीस आणि माझा घटस्फोट होऊ शकतो? असं का बोलल्या अमृता फडणवीस?
ही घटना समजताच अग्निशमनदल घटनास्थळी उपस्थित झाले. व पाण्याचा फवारा मारण्यास सुरुवात केली. सिंहगड रस्ता,(Sinhagad Road) वारजे,(Warje) कोथरूड (Kothrud) या परिसरातील पीएमआरडीए (PMRDA) कडील टँकर देखील या घटनास्थळी तातडीने उपस्थित करण्यात आले. यांच्या मदतीने आग विजवण्याचे काम चालू आहे. शॉर्टसर्किट झाल्यामुळे ही आग लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.