Manipur Violence । मणिपूर (Manipur) अजूनही पेटलेलाच आहे. कुकी (Kuki) आणि मैतेई (Maitei) या दोन गटांमध्ये सुरू असणारी हिंसा अजूनही थांबली नाही. काहीशा शांततेनंतर पुन्हा हिंसाचारांच्या घटनांना वेग येत आहेत. हिंसाचारांमुळे कित्येक संसार उद्धवस्त झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे संरक्षण करणाऱ्या जवानांवरही हल्ले करण्यात येत आहेत. अशीच एक घटना समोर आली आहे. सुट्टीवर आलेल्या जवानाची त्याच्या लहान मुलासमोर अपहरण करून हत्या करण्यात आली आहे. (Latest Marathi News)
Breaking News । ठाकरेंना धनुष्यबाण परत मिळणार? आज होणार महत्त्वाची सुनावणी
सीपॉय सेर्तो थांगथँग कोम असे या सुट्टीवर आलेल्या जवानाचे नाव आहे. ते पश्चिम इंफाळमधील तारुंग येथील रहिवासी असून भारतीय सैन्याच्या डिफेन्स सिक्युरिटी कोर प्लाटूनमध्ये कांगपोक्पी येथील लिमाखोंगमध्ये तैनात होते. (Manipur Army Jawan) सकाळच्या दरम्यान त्यांचा मुलगा त्यांच्यासोबत काम करत असताना तीन अज्ञात लोकांनी घरात घुसून त्यांच्या डोक्यावर बंदूक ठेवली आणि कारमध्ये बसवून घेऊन गेले.
Asia Cup 2023 । भारताचा श्रीलंकेवर दणदणीत विजय! आठव्यांदा जिंकले विजेतेपद
त्यानंतर या जवानाचा शोध घेण्यात आला. अखेर त्यांचा मृतदेह खुनींगथेक गावात सापडला. त्यांच्या भावाच्या मदतीने मृतदेहाची ओळख पटवण्यात आली. मृत जवानाच्या पश्चात्त त्यांची पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. या मृत जवानाच्या कुटुंबाच्या इच्छेनुसार अंत्यसंस्कार केले जातील अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. परंतु हा प्रकरणामुळे सर्वांना खूप मोठा धक्का बसला आहे.
PM Modi Birthday । नरेंद्र मोदींची संपत्ती किती? कोणकोणत्या मार्गाने कमावतात पैसे? वाचा