सातारा : जर अचानक आपल्या समोर बिबट्या उभा राहिला तर काय होईल? कल्पना करूनच आपल्या अंगावर काटा उभा राहील. पण अशीच एक अंगावर काटा आणणारी घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) घडली आहे. साताऱ्यामध्ये एक बिबट्या (Leopard) कुत्र्याचा पाठलाग करता करता एका घरामध्ये घुसला आहे. सध्या याचा व्हिडीओ देसखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
घडले असे की, एका कुत्र्याच्या पाठलाग करत करत बिबट्या घरात शिरला याचवेळी एका शेतकऱ्यांना घराचा दरवाजा बाहेरून बंद केला. त्यामुळे बिबट्या घरातच कोंडला गेला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) सध्या तुफान व्हायरल होत आहे.
शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी! दुग्धव्यवसाय सुरू करण्यासाठी आता सरकार देतय ‘इतकं’ अनुदान
सूत्रांच्या माहितीनुसार, ही घटना रात्री नऊच्या घडली. साताऱ्यातील (Satara) अनेक स्थानिक नागरिकांनी याचा व्हिडीओ शेअर केला आहे. तर गावाकडे बिबट्यांची संख्या वाढल्याचं प्रमाण अलीकडील काही वर्षांत आढळलं आहे. त्यामुळे गावाकडे राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे.
Ranbir-Rashmika: सेटवर असं काय केलं रणबीरने? रश्मीका मंदानाला कोसळले रडू