राज्यात लवकरच तलाठी भरती होणार आहे. मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या तलाठी भरतीची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याची माहिती समोर येत आहे. राज्य सरकारने याबाबत आदेश काढले आहेत. दरम्यान पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोकण, अमरावती आणि नागपूर या विभागांतील सर्व जिल्ह्यांतील चार हजार रिक्त पदे एकाचवेळी भरण्यात येणार आहेत.
मोठी बातमी! गाडीचा ताबा सुटल्याने पुणे-सोलापूर हायवेवर भीषण अपघात
यासाठी राज्य सरकारने ( State Government) महसूल विभागातील तलाठी पदाच्या भरतीसाठी समन्वयक अधिकारी नियुक्त केले आहेत. या नियुक्त केलेल्या समन्वयक अधिकाऱ्यांकडून लवकरच रिक्त जागांचा आढावा घेतला जाणार आहे. या पदभरतीसाठी ऑनलाइन परीक्षा देखील लवकरच घेतली जाणार आहे, यासाठीचा कार्यक्रम पुढील काही दिवसांत जाहीर होणार आहे. तसेच भरतीसाठी आवश्यक जाहिरातही लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे.
“मित्रामुळे वडापाव खाणे सोडले”, तेजस्विनी पंडितने केला मोठा खुलासा
या पार्श्वभूमीवर परीक्षेसाठी निवड केलेल्या कंपनीसोबत पद भरतीबाबत सामजस्य करार करणे, परीक्षेचे वेळापत्रक, परीक्षेचे नियोजन, परीक्षेचा निकाल, शिफारस झालेल्या आणि न झालेल्या उमेदवारांची यादी लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. याशिवाय उमेदवारांकडून पदभरती संबंधी आक्षेप व तक्रारी प्राप्त झाल्यास किंवा तांत्रिक पदभरती संबधित इतर अनुषंगिक कामे पूर्ण करण्यात येतील.
गौतमीच मार्केट जाम केलं संध्याने! पाहा व्हायरल व्हिडीओ
तलाठी भरतीबाबत महत्त्वाची माहिती
1) या भरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांचे वय 18 ते 38 वर्षांदरम्यान असावे.
2) भरतीमध्ये एससी/एसटी/पीडब्ल्यूडी/ओबीसी उमेदवारांना वयोमर्यादेत शिथिलता देण्यात येणार आहे.
3) दरम्यान तलाठी पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ५,२०० रुपये ते २० हजार २०० रुपये पगार दिला जाणार आहे.
पोलीस अधिकाऱ्याने आधी घरी व्हिडीओ कॉल केला नंतर आरोग्यमंत्र्यांवर गोळ्या झाडल्या