आपल्या आजूबाजूला स्त्रियांसोबत विनयभंग किंवा बलात्कार ( Rape Cases) झाल्याच्या घटना सर्रास घडत असतात. अशा घटना कुटूंबातीलच किंवा ओळखीतल्या लोकांकडून होण्याचे प्रमाण जास्त आहे. यामुळे ‘कुंपनच शेत खाते’ अशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे. प्रोफेशनल मॉडेल आणि प्रसिद्ध सोशल मीडिया इंफ्ल्यूएंसर सोहिनी दत्ता ( Sohini Datta) हिच्यासोबत देखील असा धक्कादायक प्रकार घडला आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये तिने याबाबत खुलासा केला.
सोहिनी दत्ता अवघी १५ वर्षाची असताना लैंगिक अत्याचाराची ( Sexual Harrashment) बळी ठरली आहे. तिच्यासोबत असे चुकीचे वर्तन करणारा व्यक्ती दुसरा तिसरा कुणी नसून तिच्या मावशीचा नवरा होता. तिच्या सख्ख्या मावशीच्या नवऱ्याने तिच्यासोबत अतिशय घाणेरडे कृत्य केले होते. एकदा नाही, दोनदा नाही तर, अनेकदा चुकीच्या नावाखाली त्याने सोहिनीसोबत गैरकृत्य केले.
सोहिनीचे काका शिक्षक होते. त्यांच्याकडे ती अभ्यासाला जायची. त्यावेळी सोहिनीला तिचे काका अगदी जवळचे वाटायचे. मात्र तिच्या काकांनी अनेकदा जबरदस्ती तिला किस करण्याचा व अश्लील गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. यामुळे घाबरून गेलेली सोहिनी अभ्यासासाठी दूर राजस्थानला निघून गेली होती.
घरातल्या लोकांना या गोष्टीवर विश्वास बसणार नाही. असा विचार करून तिने ती गोष्ट कुणालाच सांगितली नाही. परंतु, या गोष्टींमुळे सोहिनी डिप्रेशन मध्ये गेली होती. यानंतर काही काळाने तिने आहे त्या परिस्थितीला सामोरे जायचे ठरविले. त्यावेळी अत्यंत चतुराईने तिने आपल्या काकांनी केलेल्या कृत्याचा पाढा त्यांच्याकडून वधवून घेतला. हे सर्व रेकॉर्ड करून तिने घरी आईवडिलांना दाखविले. नंतर तिच्या काकांवर कारवाई झाली. अतिशय धीराने व खंबीरपणे सोहिनी स्वतःसाठी लढली.