अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. शेतकऱ्यांच्या पालेभाज्या, फळपिके याचे आतोनात नुकसान झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर कांदा देखील शेतकऱ्यांना रडवताना दिसत आहे. कांद्याच्या दरामध्ये घसरण झालेली असतानाच आता वांग्याच्या दरामध्येही घसरण झाली आहे. त्यामुळे बळीराजा चांगलाच अडचणीत सापडला आहे.
जेलमध्ये असलेल्या आदिलने केला राखी सावंतला फोन, म्हणाला, “मला एक संधी…”
मागच्या गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या किंमतीने राज्यातील वातावरण तापले आहे. अनेकजणांची याबाबत आक्रमक भूमिका देखील घेतल्या आहेत. यामध्येच आता वांग्याचे दर देखील घसरले आहे. कोल्हारमध्ये तर एका शेतकऱ्याची थट्टाच झाली आहे. कोल्हापुरात वांग्याला प्रति किलो फक्त 27 पैसे दर मिळाल्याची माहिती समोर आली आहे.
शेतातील पक्षी त्रास देतात म्हणून शेतकऱ्याने केला ‘हा’ देसी जुगाड; एकदा व्हिडीओ बघाच…
कोल्हापुरमधील शिरोळ तालुक्यात हा सर्व प्रकार समोर आला आहे. वांग्याला प्रति किलो फक्त 27 पैसे दर देण्यात आल्याची घटना समोर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पेठ वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हा दर देण्यात आला आहे. यामधून उत्पादन खर्च तर नाहीच पण शेतकऱ्याचा वाहतूक खर्च देखील निघाला नाही. त्यामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे.