रामदेव बाबा सोशल मीडियावर कायम कोणत्या नाकोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. मागच्या काही दिवसांपूर्वी त्यांनी एक वादग्रस्त विधान केले होते. रामदेव बाबा म्हणाले होते, महिला साडी नेसल्यावरही चांगल्या दिसतात… आणि काही नाही घातल तरी त्या चांगल्या दिसतात. असे वादग्रस्त विधान त्यांनी केले होते. यांनतर त्यांच्या या वक्तव्यामुळे खूप निर्माण झाला होता.
त्यांच्या या वक्तव्यावरुन अनेक राजकीय व्यक्तींनी देखील त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. यामध्येच आता पुन्हा सुषमा अंधारे यांनी रामदेव बाबांच्या त्या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीका करत अमृता फडणवीसांवर निशाणा साधलाय. रामदेव बाबा यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी देखील अंधारेंनी केली आहे.
विश्वास नांगरे पाटील यांच्यासाठी धक्कादायक बातमी; कोरेगाव भीमा प्रकरणी होणार चौकशी
ज्यावेळी रामदेव बाबा यांनी महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते त्यावेळी अमृता फडणवीस त्या ठिकाणी उपस्थित होत्या. मात्र तरीदेखील त्यांच्यावर कोणी आक्षेप घेतला नाही असे सुषमा अंधारे यांनी म्हंटले आहे. त्याचबरोबर पुढे त्या म्हणाल्या, अमृता फडणवीस असो किंवा राज्यातील कोणतीही व्यक्ती कोणीच याबाबत काहीच बोलले नाही यावरुनच राजकारण समजून येतं, असे देखीलअंधारे यांनी म्हटले आहे.
मोठी बातमी! बच्चू कडूंना धडकवणार आरोपी पोलिसांना सापडत नसल्याने कार्यकर्ते आक्रमक
भारतीय संविधानातील कलम ३५४ नुसार त्याच ठिकाणी रामदेव बाबा यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे होता. असं देखील सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.