
Arjun Kapoor । मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अर्जुन कपूर सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी येतो. तो लवकरच भूमी पेडणेकरबरोबर (Bhumi Pednekar) नुआ शैलीच्या थ्रिलर ‘द लेडीकिलर’ मध्ये झळकणार आहे. मागील काही दिवसांपासून अर्जुन कपूर आणि मलायका अरोराच्या (Malaika Arora) ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, आता या अभिनेत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. (Latest Entertainment News)
Mumbai Crime । मैत्रीच्या नात्याला काळिमा! डॉक्टर -डॉक्टर खेळू असे सांगितले आणि…
अर्जुन कपूरच्या कुटुंबातील जवळच्या सदस्याने अखेरचा श्वास घेतला आहे. त्याने याबाबत सोशल मीडियावर (Social media) माहिती दिली आहे. अर्जुनच्या मॅक्सिमस (Maximus) नावाच्या पाळीव कुत्र्याचे निधन झाले आहे. सोशल मीडियावर केलेल्या या पोस्टमध्ये अर्जुनने मॅक्सिमससोबतचे काही फोटो आणि एक व्हिडीओही शेअर केला आहे. सध्या सगळीकडे त्याच्या व्हिडीओची चर्चा सुरु आहे.
Ravindra Waikar । ठाकरे गटाला आणखी मोठा धक्का! उद्धव ठाकरेंच्या निकटवर्तीयांवर गुन्हा दाखल
अर्जुन कपूरने पोस्ट करत असे लिहिले आहे की, ““तू जगातला सर्वात चांगला मुलगा. दयाळू, धाडसी, गोड मॅक्सीमस आता तुझ्याशिवाय हे घर पहिल्यासारख वाटणार नाही. तू नसताना मी घरात एकटा कसा राहणार मला माहिती नाही. सतत मला तुझी नेहमी आठवण येईल. तू मला आणि अंशुला दिलेल्या प्रेमासाठी आभारी आहे,” असे अर्जुन म्हणाला.
Supriya Sule । वडील म्हणून शरद पवार कसे आहेत? सुप्रिया सुळे यांनी सांगितली आठवण
दरम्यान, सध्या अर्जुन कपूरची ही भावनिक पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्याचे चाहते आणि सेलिब्रिटी या पोस्टवर लाईक आणि कमेंट करत दुःख व्यक्त करत आहेत. तसेच अर्जुनची बहीण अंशुला कपूर हिने देखील सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.