महेश कोठारे यांच्यावर कोसळला मोठा दुःखाचा डोंगर; वडिलांनंतर आईचेही झाले निधन

A mountain of grief fell on Mahesh Kothare; Mother also passed away after father

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश कोठारे (Mahesh Kothare) यांच्या आई सरोज अंबर कोठारे (Saroj Kothare) यांचे निधन झाले आहे. त्या ९३ वर्षांच्या होत्या. दरम्यान, याच वर्षी जानेवारी महिन्यातच महेश कोठारे यांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यांच्या मागे मुलगा महेश कोठारे, सून, नातू आदिनाथ कोठारे (Adinath Kothare), नातसून ऊर्मिला कोठारे (Urmila Kothare) आणि पणतू असा परिवार आहे. (Latest Marathi News)

Havaman Andaj : राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पाऊस; ‘या’ भागांमध्ये यलो अलर्ट

याबाबत आदिनाथ कोठारेने इन्स्टाग्रामवर (Instagram) पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. “स्व. सौ. सरोज अंबर कोठारे (जेनमा). संपूर्ण कोठारे फॅमिलीतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली, आपल्या आत्म्यास चिर:शांती लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना,” असं आदिनाथने त्याच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यांच्या जाण्याने कोठारे कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.

Ajit Pawar । अजित पवारांनी पुन्हा एकदा डोळा मारला? नेमका कोणाला मारला डोळा? व्हिडीओही झाला व्हायरल

आदिनाथ याच्या पोस्टनंतर चाहते कमेंट्स सरोज कोठारे यांना श्रद्धांजली वाहत आहेत. त्याशिवाय अनेक सेलिब्रिटींकडूनही इन्स्टाग्रामवरून शोक व्यक्त केला जात आहे. २१ जानेवारी २०२३ रोजी अंबर कोठारे (Amber Kothare) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले होते.

जेवणात टोमॅटो वापरल्याने बायकोला आला राग, केलं असं काही की.. तुम्हाला बसेल धक्का

Spread the love