
संपूर्ण जगभरात भारत (India) हा कृषिप्रधान देश म्हणून प्रसिद्ध आहे. इतकंच नाही तर भारतातील सर्वाधिक लोकसंख्या ही शेती (agriculture) व्यवसायावर अवलंबून आहे. विशेष म्हणजे भारतातील लोकांचा मुख्य आणि प्रमुख व्यवसाय शेती आहे. तसेच शेतकरी (Farmes) शेतीसह आपले उत्पन्न वाढवण्यासाठी शेतीबरोबर पशुपालन, दुग्ध्यवसाय, मत्स्य व्यवसाय, शेळीपालन यासारखे जोडव्यवसाय करत आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचा शेतकऱ्यांना दिलासा, वटाण्याला तब्बल 15 हजारांचा मिळाला कमाल भाव
परतू शेतकऱ्यांना नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टीची चिंता असते. यामध्ये कधी निसर्गामध्ये होणारी पिकाची हानी, अतिवृष्टी, दुष्काळ, रोगराई, वादळी वारे यांसारख्या आपत्तींमुळे शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान होते. मात्र एक कारण अस आहे ज्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत ते म्हणजे शेतीसाठी योग्य वेळी योग्य खत मिळाले नही तर.
शेतकऱ्यांचा रासायनिक खतांच्या (chemical fertilizers) वापराकडे कल
महत्वाची बाब म्हणजे जर शेतकऱ्याला कमी वेळात शेतीतून जास्त नफा मिळवायचा असेल तर त्यासाठी रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. या रासायनिक खतांचे वैशिष्ट म्हणजे कमी वेळात अधिक उत्पन्न मिळते. इतकंच नाही तर पीक सुद्धा दर्जेदार येते. सध्या शेतीमध्ये रासायनिक खतांचे प्रमाण वाढले आहे, कारण या खतांमुळे शेतीत लवकरात लवकर परिणाम दाखवत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा रासायनिक खतांकडे कल वाढत चालला आहे.
केंद्र सरकारने डीएपी आणि युरियाचे जाहीर केले नवे भाव; ‘इतक्या’ रुपयांना मिळणार युरियाची पिशवी
ऐन रब्बी हंगामावेळी खतांचा पडला तुटवडा:-
यंदाच्या वर्षीचा खरीप हंगाम संपत आला असून आता रब्बी हंगाम सुरू होणार आहे. परंतु ऐनवेळी म्हणजे रब्बी हंगामाच्या तोंडाला शेतकऱ्याला खतांचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर एक संकट उभ राहील आहे. जर योग्य वेळी पिकांना खत मिळाले नाही तर उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट होत आणि शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होते. महाराष्ट्र
राज्यातील फक्त अकोला तालुक्यात रब्बी हंगामाच्या सुरुवातीसच तब्बल 71 हजार मॅट्रिक खतांची मागणी आहे परंतु सध्या 12 हजार मेट्रिक खत उपलब्ध असल्याने हंगामाच्या काळी खतांमध्ये तुटवडा होताना दिसत आहे.
IAS: “… मग उद्या कंडोम देखील मोफत द्यावे लागतील”, आयएस अधिकाऱ्याचे वक्तव्य चर्चेत