
एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या धक्क्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी शिवसेनेकडून महाप्रबोधन यात्रेचे देखील आयोजन करण्यात आले होते. दरम्यान मागील काही महिन्यांपासून शिवसेना व वंचित बहुजन आघाडी ( Shivsena & VBA) यांच्या युतीच्या चर्चा होत आहेत. यादरम्यान या युतीची अधिकृत घोषणा उद्या होण्याची शक्यता आहे. आता संजय राऊत यांनी याबद्दल एक सूचक ट्विट केलं आहे.
अशी झाली लक्ष्या आणि महेशची दोस्ती! कोठारेंच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात आठवणींना उजाळा
संजय राऊत यांनी ट्विट करत लिहिले की, “शिवशक्ती आणि भीमशक्तीचा एल्गार!! संयुक्त पत्रकार परिषद 23 जानेवारी 12.30 आंबेडकर भवननायगाव.. महाराष्ट्राच्या राजकारणातील नवे पर्व..” असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट केले आहे.
शिवशक्ती आणि भीमशक्तीचा
— Sanjay Raut (@rautsanjay61) January 22, 2023
एल्गार!!
संयुक्त पत्रकार परिषद
23 जानेवारी
12.30
आंबेडकर भवन
नायगाव..
महाराष्ट्राच्या राजकारणातील नवे पर्व.. pic.twitter.com/PYkNeNAO0Y
कांद्यावर रोग आलाय? टाक्या किडीने पिकाचे नुकसान होत आहे… तर चिंता करू नका; ‘हे’ उपाय करून पहा
दरम्यान, या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर ( Prakash Aambedkar) यांनी एक महत्त्वाचे विधान केले आहे. ” आमचे शिवसेनेवर लाईन मारण्याचे काम सुरु आहे, त्यामुळे व्हॅलेंटाईन डे पर्यंत काहीही होवू शकते” असे मिश्किल वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. यामुळे उद्धव ठाकरे व प्रकाश आंबेडकर यांच्या युतीच्या चर्चा जोरदार सुरू आहेत.
महिला तहसीलदाराला जाळण्याचा प्रयत्न; सख्ख्या वहिनीनेच रचला कट