
Gautami Patil । नाशिक : गौतमी पाटील हे प्रत्येक घराघरात पोहोचलेलं नाव असून लहानांपासून ते थोरांपर्यंत सर्वच जण तिचे चाहते आहेत. तिच्या प्रत्येक कार्यक्रमांना (Gautami Patil Show) तुफान गर्दी असते. ती सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येते. तिच्या प्रत्येक कार्यक्रमात (Gautami Program) राडा ठरलेलाच असतो. अनेकदा परिस्थिती नियंत्रणात आली नाही तर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागतो. (Latest Marathi News)
CNG-PNG Price । सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी! सीएनजी-पीएनजीचे घसरले दर
नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील वलखेड गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये गौतमी पाटीलचा कार्यक्रम (Gautami Patil Nashik Program) आयोजित करण्यात आला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्याकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. गौतमीला शाळेत नाचवणारे घरी जातील, असा थेट इशारा दिला आहे. परंतु, या प्रकरणी शिक्षण मंत्रीच तोंडघशी पडल्याची चर्चा रंगू लागली आहे.
Crop insurance । खुशखबर! पहिल्या टप्प्यात सव्वाकोटी शेतकऱ्यांना मिळणार पीकविमा
परंतु, आता आयोजकांनी कार्यक्रम वलखेड ग्रामपंचायतच्या मालकीच्या खुल्या जागेवर अशी माहिती दिली आहे. त्यासाठी एकता मित्र मंडळाने परवानगी घेऊन भाडे देखील दिले होते, असा दावा केला आहे. माध्यमांना चुकीची माहिती देऊन चांगल्या कार्यक्रमांना बदनाम केले जात आहे, असा आरोप एकता युवक मित्र मंडळाचे अध्यक्ष आणि वलखेडचे सरपंच विनायक शिंदे यांनी केला आहे.
Alibaug News । धक्कादायक बातमी! अंगावर वीज पडून पिता-पुत्राचा जागीच मृत्यू