राज्याच्या राजकारणात एकापाठोपाठ एक नवीन ट्विस्ट येत आहेत. २०२४ मध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार ? याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. यामध्ये अनेक राजकीय नेत्यांची नावे समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्रीपदावर आपला दावा व्यक्त केला आहे. ठाकरे गटानेही अगामी काळात आपलाच मुख्यमंत्री होईल असे जाहीर केले आहे. तर भाजप नेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis) यांनाच पुढचा मुख्यमंत्री समजत आहेत.
अशातच कसब्याचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी देखील मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भर पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री पदावरून प्रश्न विचारण्यात आला असता, रवींद्र धंगेकर यांनी मला सुद्धा मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे, असे सांगितले. अर्थात त्यांनी हे विधान मिश्कीलपणे केले होते. यामुळे उपस्थितांमध्ये हशा सुद्धा पिकला होता.
Ajinkya Rahane: एम एस धोनीने अजिंक्य रहाणेचे नशीब फिरवले, टिम इंडियाने घेतला मोठा निर्णय!
दरम्यान, रवींद्र धंगेकर यांनी अजित पवार ( Ajit Pawar) मुख्यमंत्री व्हावेत अशी आपली इच्छा असल्याचे सांगितले आहे. ” २०२४ मध्ये अजित पवार मुख्यमंत्री झाले तर मला आवडेल. अजितदादा मोठे झालेले माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कधीही आवडणार आहे. अजितदादा हे दादा आहेत आणि दादा जे बोलतात तेच करतात !” असे रवींद्र धंगेकर म्हणाले आहेत.