मुंबईतील मीरा रोड हत्याकांडात राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या लिव्ह इन पार्टनरची हत्या केली. यानंतर आरोपींनी मृतदेह कुकरमध्ये शिजवून मिक्सरमध्ये बारीक करून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, न्यायालयाने त्याला १६ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. मात्र या प्रकरणात आणखी एक नवा खुलासा झाला आहे. (Mumbai Mira Road Massacre)
नाद करा पण आमचा कुठं! शेतकरी कुटुंबातील मुलाने लग्नाला वऱ्हाड थेट बैलगाडीनं नेलं…
सरस्वती वैद्यचा मुंबईत तिच्या लिव्ह-इन पार्टनरने कथितपणे खून केल्यावर तिचा मृतदेह तुकड्यांमध्ये सापडला होता. याबाबत अनेक नवनवीन खुलासे होत आहेत. 2014 मध्ये एका रेशन दुकानात आरोपीची आणि सरस्वतीची ओळख झाली होती. 56 वर्षीय मनोज साने हे दुकानात काम करायचे. दोघांनी आधी रेशनच्या दुकानात डेट करायला सुरुवात केली आणि नंतर एकत्र राहू लागले.
ब्रेकिंग! बारामती, दौंड परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू
या घटनेबाबत मनोजने देखील मोठा खुलासा केला आहे. तो म्हणाला, मला सरस्वतीच्या चारित्र्यावर संशय होता. यामुळे आमची सतत भांडण होत होती त्यामुळे तिने ४ जूनला विष घेतलं आणि त्यात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर सरस्वतीला आत्महत्येला प्रवृत्त केल्याबद्दल आपल्यालाच दोषी धरलं जाईल या भीतीने मी सर्व लपवण्यासाठी तिच्या शरीराचे तुकडे केले आणि त्याची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला. अशी माहिती आरोपीनंच पोलिसांना दिली आहे.