
केरळमधील एक ट्रान्सजेंडर कपल (Transgender couple from kerala) मागील काही दिवसांत चांगलेच चर्चेत आहे. या ट्रान्सजेंडर जोडप्याने गुड न्यूज दिली असून लवकरच त्यांच्या घरी नवा पाहुणा येणार आहे. जिया आणि जिहाद असे या जोडप्याचे नाव आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी आपण आई-बाबा होणार असल्याची बातमी सर्वांना दिली आहे. मार्च मध्ये त्यांचे पहिले बाळ जन्माला येणार आहे.
देशातील साखर उत्पादनात वाढ; साखरेच्या दरात होऊ शकते घसरण
केरळच्या कोझिकोडमध्ये हे ट्रान्सजेंडर कपल आहे. जिया आणि जिहाद हे मागील तीन वर्षांपासून रिलेशनशीप मध्ये आहेत. जियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिच्या प्रेग्नेंसीचे फोटो शेअर करत पोस्ट केली आहे. ” मी जन्मापासून महिला नाही. मात्र मी आई होण्याचे स्वप्नं पाहिले होते. एखाद्या मुलाने मला आई म्हणून हाक मारावी अशी माझी खूप इच्छा होती.” असे तिने या पोस्ट मध्ये लिहिले आहे.
इंस्टाग्राम रिल्स मधून ‘असे’ कमवा पैसे! फक्त व्हिडीओ बनवून व्हाल मालामाल
तसेच मागील तीन वर्षांपासून मी व जिहाद एकत्र आहोत. आता जिहादचे व माझे आई-बाबा होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. सध्या जिहादच्या पोटात आमचे आठ महिन्यांचे बाळ आहे. असे देखील जियाने आपल्या पोस्ट मध्ये सांगितले आहे. खरंतर जिया व जिहादला गर्भधारणेसाठी शस्त्रक्रिया करावी लागली. जिया व जिहाद यांनी आपल्या इच्छेप्रमाणे लिंग बदलाची शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेनंतर जिया पुरुषाची महिला झाली आणि जिहाद महिलेचा पुरुष. मात्र, लिंग बदल करताना जिहादच्या शरीरात असणारे गर्भाशय आणि महिलांमध्ये असणारे काही अवयव शरीराबाहेर काढण्यात आले नव्हते. यामुळेच शस्त्रक्रियेच्या मदतीने जिहादला पुरुष झाल्यानंतरही गर्भधारण करता आलं. आता लवकरच त्यांना बाळ होणार आहे.