सध्या लोकांमध्ये ऑनलाईन (online) काम करण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे. ऑनलाईन जेवण मागविणे, कपडे खरेदी करणे, हॉटेल बुकिंग करणे, अशा अनेक गरजांसाठी लोक ऑनलाईन साधनांचा वापर करतात. ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण देखील खूप वाढले आहे. यामध्ये आता अशीच एक धकाकदायक घटना समोर आली आहे. ऑनलाईन हॉटेल बुक करणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे.
एका चित्रपट दिग्दर्शकाने केली मोठी घोषणा! श्रद्धा वालकर हत्याकांडावर चित्रपट बनवणार..
माहितीनुसार, ७४ वर्षीय व्यक्ती महाबळेश्वरला (Mahabaleshwar) फिरायाला जायचे आहे म्हणून ऑनलाईन हॉटेल बुकिंग करत होते. “द किज एवरशाईन रिसॉर्ट” या हॉटेल मध्ये बुकिंग करण्यासाठी त्यांनी एक ऑनलाईन वेबसाईट निवडली त्यावेळी या वेबसाईटवर त्यांना एक मोबाईल नंबर देत त्या नंबरवर तुमचे बुकिंग केले जाईल असे देखील सांगण्यात आले. नंतर त्यांना ऍडव्हान्स मागितला व त्यांनी बुकिंगसाठी एक लाख रुपये पाठवले पण त्यांना नंतर कोणताच फोन आला नाही.
पीएम किसान योजना तुन कोट्यवधी लोकांना वगळले; जाणून घ्या, कोणाला मिळणार नाही योजनेचा पुढचा हप्ता
ऑनलाईन हॉटेल बुक करण्याच्या नादात सायबर चोरट्यांनी 74 वर्षीय व्यक्तीला एक लाख रुपयांना गंडा घातला आहे. आपली फसवणूक झाल्याचे या व्यक्तीच्या लक्षात येताच त्याने पोलिसात तक्रार नोंदवली. आता या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस यंत्रणा करत आहे.
धक्कादायक! गाडी दरीत कोसळून १२ जणांचा जागीच मृत्यू; वाचा सविस्तर