धाराशिव (Dharashiv) येथे एक धक्कादायक घडली आहे. याठिकाणी आंबा खायला देतो असे आमिष दाखवून एका आठ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार (Sexual Harrashment) करण्यात आला. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे आरोपीचे पीडित मुलीच्या कुटुंबीयांसोबत ५ ते ६ वर्षांपासून चांगले संबंध होते.
काल (ता.२५) सकाळी ९ च्या दरम्यान आरोपी चिमुकल्या मुलीच्या घरी आला. आमच्या घरी पाडाचे आंबे आहेत, ते तुम्हाला देतो. तुमच्या दिदीला सोबत पिशवी घेऊन पाठवा. असे म्हणून आरोपी चिमुकलीला आई व आजोबांसमोर आंबे देण्यासाठी सोबत घेऊन गेला.
समृद्धी महामार्गाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली मोठी घोषणा, म्हणाले…
मात्र, बराच वेळ झाला तरी चिमुकली घरी आली नाही म्हणून तिची आई व आजोबा आरोपीच्या घरी गेले. त्यावेळी आरोपी व चिमुकली घरी न्हवते. दरम्यान आई व आजोबांनी काळजीने पूर्ण गावभर मुलीला शोधले. त्यानंतर बऱ्याच वेळाने आरोपी मुलीला घरी घेऊन येताना दिसला. यावेळी शेतात आंबे आणायला गेलो होतो त्यामुळे वेळ लागला असे सांगून आरोपीने पळ काढला.
तीन डॉक्टरांनी मिळून तरुणासोबत केलं भयानक कृत्य, तरुणाने थेट जीवनच संपवलं; घटना वाचून बसेल धक्का
घरी गेल्यानंतर चिमुकलीच्या आईने विश्वासात घेऊन तिच्याकडे चौकशी केली. त्यावेळी तिने शेतात घडलेला प्रकार सांगितला. रात्री चिमुकलीच्या आईने तिच्या वडिलांच्या कानावर सर्व प्रकार घातला. यानंतर मुलीच्या पालकांनी जवळच्या पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी रात्रीच आरोपीला अटक केली असून याबाबत अधिकचा तपास सुरू आहे.
पुणे लोकसभा पोटनिवडणुकीबाबत अजित पवार यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले…