नागराज मंजुळेचा ( Nagraj Manjule) सैराट हा सिनेमा ( Sairat Movie) अतिशय लोकप्रिय सिनेमांपैकी एक म्हणून आजही ओळखला जातो. या सिनेमातील आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू आणि परश्या म्हणजेच आकाश ठोसर ( Aakash Thosar) यांना प्रचंड प्रसिद्धी आणि सन्मान मिळाला. या दोघांच्या भूमिकांवर आजही लोक तितकेच प्रेम करतात. दरम्यान ‘सैराट’ च्या जबरदस्त यशांनातर आकाश ठोसरने झुंड, एफयु, घर बंदूक बिर्याणी यांसारख्या सिनेमांमध्ये काम केले. याशिवाय लस्ट स्टोरीज, १९६२: द वार इन द हिल्स या वेबसिरीज मध्ये देखील तो झळकला.
भाजपच्या पराभवावर अजित पवार यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “पुन्हा एकदा विकास आणि…”
मात्र एक प्रसिद्धी सेलिब्रिटी असूनसुद्धा आकाश सोशल मीडियावर फार ऍक्टिव्ह नसतो. इतर कलाकारांच्या तुलनेत तो खूप कमी प्रमाणात सोशल मीडियावर दिसतो. यासंदर्भातील खुलासा त्याने नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये केला आहे. काळाची गरज असूनसुद्धा तू सोशल मीडियावर फारसा का नसतो? असा प्रश्न मुलाखतीदरम्यान आकाशला विचारण्यात आला होता.
यावर उत्तर देताना तो म्हणाला की, ” मला सतत सोशल मीडियावर सक्रिय राहण्याची गरज वाटत नाही. मला निवांत राहायला फार आवडतं. ट्रेकिंग आणि खाणं या दोन गोष्टींसाठी मी सतत फिरतो. या सगळ्याच गोष्टींची सोशल मीडियावर पोस्ट व प्रसिद्धी कशासाठी करायची ? असा प्रश्न मला वारंवार पडतो. मी माझे क्षण मजेत जगतो आणि मला तसंच जगायला आवडतं. चित्रपट किंवा प्रमोशननिमित्त जितकं सोशल मीडियावर असायला हवे, तितकाच मी असतो. “