ओडिसाच्या बालासोरमध्ये शुक्रवारी संध्याकाळी मालगाडी आणि दोन एक्स्प्रेस यांच्यात झालेल्या धडकेत मृतांची संख्या २६१ वर पोहोचली आहे. तर 900 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. माहितीनुसार, 650 लोक रुग्णालयात दाखल आहेत. रेल्वे अपघातानंतर बालासोर जिल्हा रुग्णालय आणि सोरो रुग्णालयात मोठ्या संख्येने जखमींना आणण्यात आले, त्यामुळे या रुग्णालयांच्या खोल्या तुडुंब भरल्या गेल्या आणि जखमींना कॉरिडॉरमध्येही ठेवण्यात आले. रुग्णालयाचे शवगृह पांढर्या आच्छादनात गुंडाळलेल्या मृतदेहांनी भरलेले आहे, त्यापैकी अनेकांची ओळख अद्याप पटलेली नाही.
Gmail वरील नको त्या Emails मुळे झालाय त्रस्त? जाणून घ्या सर्व ईमेल एकत्र डिलीट करण्याचं टेक्निक
पीएम मोदी भुवनेश्वरपासून सुमारे 170 किमी उत्तरेस बालासोर जिल्ह्यातील बहनगा बाजार स्थानकाजवळ हवाई दलाच्या हेलिकॉप्टरमधून उतरले. बालासोर जिल्हा रुग्णालयात त्यांनी जखमींची भेट घेतली. या दुर्घटनेला जो कोणी जबाबदार असेल त्याला सोडले जाणार नाही, असे पीएम मोदी म्हणाले.
ब्रेकिंग! पंकजा मुंडे राष्ट्रवादीत जाणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
एनडीआरएफच्या तीन तुकड्या, अग्निशमन दल आणि बचाव दलाच्या 20 तुकड्या घटनास्थळी आहेत. यापैकी 1200 बचावकर्ते आहेत. अपघातानंतर घटनास्थळी 115 रुग्णवाहिका, 50 बस आणि 45 मोबाईल हेल्थ युनिट तैनात करण्यात आले होते. एनडीआरएफ आणि वायुसेनेने बचावकार्यासाठी हेलिकॉप्टर पाठवले. भुवनेश्वर, कोलकाता येथूनही बचाव पथके पोहोचली आहेत.
धक्कादायक घटना! मोबाईलचा स्फोट झाल्याने दहा वर्षीय मुलगा गंभीर जखमी