बऱ्याचदा आपली एखादी छोटीशी कृती समोरच्या व्यक्तीसाठी जीवनदान ठरते. रक्तदान किंवा अवयवदान यांसारख्या गोष्टी केल्यानंतर याची अनुभूती येतेच. शिवाय अनेकदा मदत म्हणून दाखवलेली माणुसकी (Humanity) सुद्धा इतर लोकांसाठी फायदेशीर ठरते. अशीच माणुसकी दाखवून एका तरुणाने रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याचे प्राण वाचवले आहेत. नाशिकच्या ( Nashik) मनमाडमध्ये ही घटना घडली आहे.
Cabinate Expansion | शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच! ‘या’ मोठ्या नेत्याने केला खुलासा
याठिकाणी नागेश दंडे हे रेल्वे पोलीस कर्मचारी आपल्या दुचाकीवरून जात होते. यावेळी अचानक ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांच्या छातीत दुखू लागले आणि ते गाडीवरून खाली कोसळले. यावेळी भरपूर लोक त्यांच्या आजूबाजूला जमले होते. दरम्यान रस्त्यात झालेली गर्दी पाहून भागवत झल्टे हा तरुण पुढे आला. पोलीस कर्मचारी नागेश दंडे यांना अस्वस्थ अवस्थेत पाहून त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे भागवतने ओळखले.
धक्कादायक घटना! लिफ्टमध्ये मान अडकल्याने १३ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू
यावेळी परिस्थितीचे भान राखत भागवतने नागेश यांच्या छातीवर दोन तीनदा दाब देऊन त्यांना तोंडाने श्वास देण्याचा प्रयत्न केला. त्याच्या या प्रयत्नामुळे नागेश दंडे हे शुद्धीवर आले. त्यानंतर तात्काळ त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केली असता नागेश यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे समोर आले. यावेळी भागवतने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे नागेश यांचे प्राण वाचले. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
शेतकऱ्यांनो फळबाग लावायचा विचार करताय? तर मग ही बातमी तुमच्यासाठी; सरकार देतंय अनुदानासह मोफत रोपे