Maharashtra Politics । नाशिक : महायुतीमध्ये (Mahayuti) अजूनही काही जागांवरचा तिढा सुटला नाही. अशातच आता राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. (Loksabha election) मागील काही दिवसांपासून नाशिक लोकसभेच्या (Nashik Lok Sabha) जागेवरुन महायुतीमध्ये रस्सीखेच सुरु आहे. महायुतीचे घटक पक्ष असलेले भाजप आणि शिंदे गट या जागेवर दावा करत आहे. अजित पवार गटालाही ही जागा मिळू शकते. आज नाशिकमध्ये मोठा राजकीय भूकंप येऊ शकतो.
Muralidhar Mohol । मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी भाजपचा ‘मास्टर प्लॅन’, आखली विशेष रणनीती
शिंदे गटाचे हेमंत गोडसे (Hemant Godse) हे नाशिकचे विद्यमान खासदार असून त्यांनी ही जागा आपल्यालाच मिळावी, यासाठी मोठं शक्ती प्रदर्शन केल. इतकेच नाही तर त्यांनी नाशिकमध्ये प्रचाराला सुरुवात सुद्धा केली. आज छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. जर येथे छगन भुजबळ यांना उमेदवारी झाली तर हेमंत गोडसे हे काय भूमिका घेतात? याकडे सर्वांचे लक्ष असेल.
Rashmi Barve । “भाजपच्या वरिष्ठ नेत्याकडून माझं नैतिक वस्त्रहरण”; रश्मी बर्वेंचा सर्वात गंभीर आरोप
दरम्यान, नाशिकमध्ये मागील दोन टर्मपासून हेमंत गोडसे हे खासदार आहेत. आतापर्यंत ही जागा शिवसेनेकडे होती. पण शिवसेनेमध्ये दोन गट झाल्यानंतर ताकद देखील विखुरली गेली. शिवाय नाशिकमध्ये भाजपचे आमदार, नगरसेवक मोठ्या संख्येने असल्याने नाशिकच्या या जागेवर भाजपाकडूनही दावा सांगितला जात आहे.
Beed Loksabha । बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग, ज्योती मेटेंनी लोकसभेपूर्वी घेतला मोठा निर्णय