बिहारमध्ये (Bihar) एक गर्भवती पत्नी तिच्या पतीला जेलमध्ये भेटण्यासाठी गेली होती. तिथे तिने तिच्या पतीचा चेहरा बघतातच, ती जमिनीवर कोसळली आणि तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक (Death of a pregnant woman) घटना घडली आहे. ही गंभीर घटना बिहारच्या भागलपूरमध्ये (Bhagalpur jail) घडली आहे. तुरुंगामध्ये खाली कोसळल्यानंतर त्या महिलेला लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याची माहिती दिली.
त्या स्त्रीला तिच्या पतीची जेलमधील अवस्था बघवली नाही आणि ती बघूनच तिला मोठा धक्का बसला. व ती बेशुद्ध पडली. त्या महिलेच्या नातेवाईकांनी या घटनेस पोलिसांनाच जबाबदार धरले आहे. 6 जूनला ही महिला तिच्या पतीला भेटण्याचा हट्ट करू लागली होती. तिच्या सासऱ्यांनी तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला होता. परंतु ती कोणाचे देखील ऐकत नव्हती. कोणत्याही परिस्थितीत तिला तिच्या पतीला भेटायचं होतं. शेवटी तिच्या सासर्यांनी ऐकले आणि तिला भागलपुर कारागृहात घेऊन गेले. त्यानंतर तिच्या पतीची अवस्था बघून ती धाडकन खाली पडली आणि तिचा मृत्यू झाला.
चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल; म्हणाल्या, “सुप्रियाताई तुम्ही तर सरड्याप्रमाणे रंग…”
गोविंदपूर (Govindpur) येथे राहणाऱ्या गुड्डू ने दोन वर्षांपूर्वी पल्लवीशी विवाह केला होता. काही दिवसांपूर्वी गुड्डू आणि विनोद यादव यांच्यामध्ये जमिनीवरून काहीतरी वाद झाला होता. दोन्हीही कुटुंबीयांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानंतर गुड्डूला जेलमध्ये जावं लागलं. पल्लवीची प्रसूती लवकरच होणार होती. परंतु, त्या आधीच तिचा मृत्यू झाला. त्यामुळे ते कुटुंब उध्वस्त झालं आहे. तिचं बाळ या जगात येण्याआधीच संपलं. गुड्डूला त्याच्या पत्नीच्या अंतिम संस्कारसाठी जेलच्या बाहेर जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. या प्रकरणासंदर्भात गुड्डूचा भाऊ विकीने पोलिसांवर आरोप केला आहे. गुड्डूच्या कुटुंबीयांचं असं म्हणणं आहे की यासाठी पोलीस प्रशासनच जबाबदार आहे.
“…म्हणून मी प्रेयसीचे तुकडे केले”, नराधम मनोजने केला धक्कादायक खुलासा