पुणे: पुणे (Pune) जिल्ह्यातील आंबेगावमध्ये (Aambegav) एक दुर्दैवी घटना घडली आहे. आंबेगाव येथील खासगी शाळेच्या (private school) बसचा दरीत कोसळून अपघात झाला आहे. ही घटना पुण्यातील घोडेगाव (Ghodegav)परिसरात घडली आहे. हा बसचा अपघात (Bus accident)चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने झाला आहे. दरम्यान सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
घटना अशी घडली ?
पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील मुक्ताई प्रशाला पिंपळघोडे येथील शाळेची बस गिरवली येथील आयुका दुर्बीण पाहण्यासाठी गेली होती. यावेळी या बसमध्ये एकूण 44 विद्यार्थी आणि 3 शिक्षक असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दरम्यान गिरवलीला जात असताना एका वळणावर बस चालकाचे नियंत्रण सुटून बस थेट दरीत कोसळली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
या घटनेची माहिती मिळताच तातडीने रुग्णवाहिका आणि वैद्यकीय सुविधा अपघातस्थळी दाखल झाल्या होत्या. बसमधील मुले ही किरकोळ जखमी झाली आहेत. दरम्यान या 44 विद्यार्थ्यांपैकी चार विद्यार्थ्यांना मंचर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी या अपघातातनंतर पालकांमध्ये भीतीचे वातावरण असून पालकांनी घाबरून जाऊ नये अस आवाहन केले आहे.