
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने ते चांगलेच चर्चेत आले आहेत. यामुळे राजकीय वातावरण देखील चांगलेच तापले आहे. अशातच आता चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकून हल्ला करण्यात आला आहे. आता याबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
“छत्रपती शिवाजी महाराज कुणबी समाजाचे होते”; नाना पटोलेंच विधान चर्चेत
डेमोक्रेटीक पार्टी ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनीही मोठी घोषणा केली आहे. चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेकणाऱ्या मनोज गडबडे व त्याचे व्हिडीओ काढणारे पत्रकार गोविंद वाकडे यांची हत्तीवरुन मिरवणूक काढण्याचा निर्णय डेमोक्रेटीक पार्टी ऑफ इंडियानं घेतला आहे.
गुणरत्न सदावर्ते यांची मागणी, छत्रपती उदयनराजे महाराज यांना अटक करा
काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?
चंद्रकांत पाटील म्हणाले, “ पहिल्या काळात शाळांसाठी अनुदान देत नव्हते. तरीदेखील महापुरुषांनी शाळा उघडल्या. पण, आता लोकं शाळांच्या अनुदानासाठी सरकारवर अवलंबून राहत आहेत. त्याकाळी महापुरुषांना सरकारनं शाळा सुरु करण्यासाठी अनुदान दिले नाही, त्यांनी लोकांकडं भीक मागितली”