Site icon e लोकहित | Marathi News

चक्क अजगराने केला बिबट्यावर हल्ला; दोघांची लागली झुंज

A python attacked a leopard; Both started fighting

सोशल मीडियावर अनेक थक्क करणारे व्हिडिओ आपल्याला पहायला मिळतात. खाण्याच्या वेगवेगळ्या प्रकारांपासून ते प्राण्यांच्या विविध करामतींचा यामध्ये समावेश असतो. सोशल मीडियावर ( Video On Social Media) नुकताच एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये एक अजगर चक्क बिबट्यावर हल्ला करत असल्याचे दिसत आहे.

या चहाची किंमत आहे कोटींच्या घरात; जगातील सर्वात महागड्या चहाबद्दल तुम्हाला माहित आहे का?

या व्हिडीओमध्ये ( Viral Video) एक बिबट्या पाणवठ्याजवळ बसलेला असून त्याच वेळी एक अजगर बिबट्यावर हल्ला करतो. यावेळी बिबट्या सुद्धा मागे न हटता अजगराशी झुंज देतो. ही झुंज पाहताना तर खरी मज्जा येते. अजगराचे बिबट्यावर हल्ला करणे आणि बिबट्याने त्याला प्रतिकार करणे, हे खरंच पाहण्यासारखं आहे.

दुधाच्या दरात पुन्हा वाढ; ‘हे’ आहेत नवीन दर

आजपर्यंत आपण अनेकदा जास्त ताकदीच्या प्राण्यांनी कमी ताकदीच्या प्राण्यांवर हल्ला करताना पाहिले आहे. परंतु या व्हिडीओमध्ये कमी ताकदीचा प्राणी जास्त ताकदीच्या प्राण्यावर हल्ला करत आहे. हे पाहून नेटकरी सुद्धा आश्चर्यचकित झाले आहेत.

बिग ब्रेकिंग! पुण्यातील नवले ब्रिज जवळ भीषण अपघात! कंटेनरने २६ गाडयांना उडविले

Wildlifeanimal या इंस्टाग्राम ( Instagram) हॅन्डल वरून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला असून मागील काही दिवसांपासून हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध कमेंट केल्या असून या पोस्ट वर भयंकर लाईक्स चा पाऊस पडत आहे.

ओबीसी आरक्षण वाढवण्याची मागणी; प्रकाश आंबेडकरांकडून आंदोलनाचा इशारा

Spread the love
Exit mobile version