Site icon e लोकहित | Marathi News

भगतसिंग कोश्यारींचे धोतर फेडणाऱ्यास किंवा फाडणाऱ्यास १ लाखांचं बक्षीस; राष्ट्रवादी आक्रमक

A reward of 1 lakh for those who pay or tear Bhagat Singh Koshyari's dhoti; Nationalist aggression

राज्यपाल (Governor) कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबतच्या केलेल्या एका वक्तव्यामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे. ‘शिवाजी महाराज तर जुने युगाचे हिरो, डॉ. आंबेडकरांपासून तर डॉ. गडकरीपर्यंत नव्या युगाचे हिरो असल्याचे भगतसिंग कोश्यारी म्हणाले आहेत . त्यांच्या या वक्तव्याचा जोरदार निषेध होत आहे. यावर अनेक स्तरातून प्रतिक्रिया देखील येत आहेत.

शेतकऱ्याचा एक लाखाचा कापूस गेला चोरीला, ‘या’ ठिकाणी घडली घटना; वाचा सविस्तर

दरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला असून या पक्षाचे संदीप काळे (Sandip Kale) यांनी शहरातील अनेक ठिकाणी बॅनर लावून भगतसिंग कोश्यारींच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श होते, आहेत आणि राहणार असे देखील यावेळी ते म्हणाले आहेत.

‘हे’ जोडपे झाले ‘रातोरात मालामाल’! किचनच्या फरशीखाली सापडली जुनी नाणी

त्याचबरोबर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच धोतर फेडणार्‍यास १ लाख रोख रक्कम दिली जाईल असं देखील बॅनरवर लिहिण्यात आले आहे. अध्या सोशल मीडियावर या बॅनरची जोरदार चर्चा सुरु आहे.

स्टिंग मॅगीचा ‘हा’ प्रकार तुम्हाला माहित आहे का? व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल

Spread the love
Exit mobile version